ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

आषाढी वारीत आशा स्वयंसेविकांमार्फत आरोग्य जनजागृती:आरोग्य विभागाच्या सूचना, निरोगी वारी सुरक्षित वारीचा संदेश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आषाढी वारी-२०२६ दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्यातील आशा स्वयंसेविकांमार्फत व्यापक आरोग्य जनजागृती राबविण्याचे निर्देश आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संजय काटकर यांनी दिले आहेत. पंढरपूर आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा सोहळा असून, या काळात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. गर्दी, प्रवास, बदलते हवामान तसेच संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वारकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आशा स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा आधारस्तंभ असून, त्यांनी गावपातळीवर बैठका, घरभेटी, समूह संवाद तसेच आयईसी (IEC) साहित्याच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. वारीदरम्यान उपलब्ध असलेल्या आरोग्य शिबिरांची माहिती, आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा, स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याची काळजी, सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर, उष्माघात, निर्जलीकरण व अतिसारापासून बचाव, हात स्वच्छ धुण्याची सवय, संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास तात्काळ आरोग्य संस्थेशी संपर्क तसेच आवश्यक औषधे व वैयक्तिक आरोग्य साहित्य सोबत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना काटकर यांनी दिल्या आल्या आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता, लहान मुले आणि इतर संवेदनशील गटांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या प्रभावी जनजागृतीमुळे वारकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल आणि “निरोगी वारी, सुरक्षित वारी” हा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर