ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शेतीच्या वादातून दोघा पुतण्यांकडून चुलत्याचा खून:कामती खुर्द येथील प्रकार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने केले वार‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जमिनीच्या जुन्या वादातून कामती खुर्द (लमाणतांडा) येथील ७२ वर्षीय संजीवकुमार नागनाथ शिंदे यांचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संजीवकुमार शिंदे यांचे वडील नागनाथ शिंदे यांनी १९९८ मध्ये त्यांच्या मालमत्तेचे तीन मुलांमध्ये वाटप केले होते. त्यानुसार संजीवकुमार यांना १२ एकर शेतजमीन मिळाली होती. या वाटपावरून कुटुंबात वाद सुरू होते. यापूर्वीही न्यायालयात प्रकरण गेले होते व २०२३ मध्ये निकाल शिंदे कुटुंबाच्या बाजूने लागला होता. त्यानंतर संजीवकुमार शिंदे यांनी त्यांच्या मालकीच्या १२ एकर जमिनीपैकी ६ एकर जमीन विजय धाडगे, विनय धाडगे व ज्योती धाडगे यांना विक्री केली होती. या व्यवहाराला नातेवाइकांनी हरकत घेतली होती. याच रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप मृताच्या पत्नी सुनीता शिंदे यांनी फिर्यादीत केला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी संजीवकुमार शिंदे हे दूध व पाणी आणण्यासाठी घरातून गेले होते. काही वेळाने त्यांना पतीचा आवाज ऐकू आला. त्या घटनास्थळी गेल्या असता रणजित सतीश शिंदे व रितेश सतीश शिंदे यांच्या हातात तलवारी होत्या. तर सुरेखा सतीश शिंदे यांनी संजीवकुमार यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याचे त्यांनी पाहिले. दोघांनी तलवारीने संजीवकुमार यांच्या डोक्यावर, गळ्यावर व हातावर वार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर