ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

नांदेडची अभिमानास्पद बातमी:भावाच्या अकाली निधनानंतर 2 मुले उघड्यावर; छोट्या भावाने भावजयीशी विवाह करून दिला आधार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर छोट्या भावाने आपल्या भावजयीशी लग्न करून उघड्यावर पडलेल्या आपल्या पुतण्यांना वडिलांची माया दिल्याची अभिमानास्पद घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचा आधार हिरावला जातो. मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्रही हरवले जाते. एवढेच नाही तर नातेसंबंधातंही दुरावा निर्माण होतो. मात्र, नांदेड जिल्ह्यातील दुर्गम किनवट तालुक्यात या सर्वांना छेद देणारी एक घटना घडली आहे. प्रस्तुत घटनेत मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर छोट्या भावाने भावजयीशी विवाह करून भावाच्या मुलांच्या डोक्यावर पुन्हा पितृछत्र धरल्याची घटना घडली आहे. प्रफुल्ल पाटील असे या धाडसी निर्णय घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मार्च महिन्यात झाले होते मोठ्या भावाचे निधन यासंबंधीच्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील अष्टपाल पाटील यांचे गत महिन्यात प्रदिर्घ आजाराने निधन झाले होते. अष्टपाल यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची पत्नी विजयालक्ष्मी यांच्यासह 8 वर्षीय मुलगी व 6 वर्षीय अंध मुलगा उघड्यावर पडला. मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. हे पाहून धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील यांनी या प्रकरणी एक धाडसी निर्णय घेत आपल्या भावजयीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा प्रस्ताव आपल्या कुटुंबीयांपुढे ठेवला. प्रफुल्ल पाटील यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी साथ दिली. त्यांनी विजयालक्ष्मी यांची समजूत काढली. त्यांच्या आई-वडिलांनाही विश्वासात घेतले. त्यानंतर प्रफुल्ल व विजयालक्ष्मी यांचे एका छोटेखानी कार्यक्रमात लग्न लावून देण्यात आले. वैयक्तिक सुखाचा त्याग करून रक्ताच्या नात्याला व माणुसकीला महत्त्व देणाऱ्या प्रफुल्लच्या या निर्णयाचे ग्रामस्थ तोंडभरून कौतुक करत आहेत. वहिनीला सन्मानाने जगता यावे म्हणून घेतला निर्णय प्रफुल्ल पाटील हे व्यवसायाने ऑटोचालक आहेत. ते ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी स्वतःच्या संसाराचा विचार करण्यापेक्षा आपल्या भावाच्या मुलांच्या भविष्याला प्राधान्य दिले. माझ्या भावाच्या पश्चात ही मुले अनाथ होऊ नयेत, तसेच वहिनीला समाजात सन्मानाने जगता यावे, हा या विवाहामागील माझा मुख्य उद्देश होता. ही केवळ माझी जबाबदारी नसून, भावाप्रती असलेले माझे कर्तव्यही आहे, अशी भावना प्रफुल्ल यांनी या प्रकरणी व्यक्त केली. विखुरलेलं कुटुंब पुन्हा एकत्र किनवट तालुक्यात घडलेली ही घटना समाजात माणुसकी आणि कुटुंबाच्या नात्यांची जपणूक किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय देणारी ठरली आहे. मोठ्या भावाच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत छोट्या भावाने केवळ कर्तव्य पार पाडले नाही, तर आपल्या पुतण्यांना वडिलांची माया देत त्यांच्या भवितव्यासाठी आधारही निर्माण केला. या निर्णयामुळे एक विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले. समाजात या कृतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर