ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

नकारात्मक प्रचारामुळे विरोधकांचा पराभव:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; शरद पवार मार्गदर्शन करण्यात कमी पडल्याचा टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नकारात्मक प्रचारामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा पराभव झाल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला राज्यात मोठे यश मिळाल्याचेही ते यावेळी म्हणाले. राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांसाठी गत शनिवारी निवडणूक झाली होती. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीचा बहुतांश जागांवर विजय झाला, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने आपली पराभवाची मालिका सुरू ठेवली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या पराभवासाठी त्यांचा नकारात्मक प्रचार कारणीभूत ठरल्याचा दावा केला. पुण्यात अजित पवारांच्या पक्षाला यश

ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो, तेव्हा आम्ही ग्रामीण भागातील जनतेपुढे केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारच्या योजना मांडल्या. आज मला आनंद वाटतो की, फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आम्हाला महाराष्ट्रात एक मोठे यश मिळाले. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. हा जिल्हा अजित पवार यांच्याच पाठिशी आहे. येथे अजित पवारांना मते मिळाली असले तरी ती पर्यायाने महायुतीलाच मिळाली आहेत. महाराष्ट्रात महायुतीचाच विजय होईल. त्यानंतर काही अजित पवारांचे, तर काही एकनाथ शिंदे यांचे अध्यक्ष होतील. अधिकाधिक ठिकाणी भाजपचे अध्यक्ष होतील. पण महाराष्ट्रात सर्वत्र महायुतीचेच चित्र दिसेल हे निश्चित आहे. नकारात्मक प्रचारामु्ळे विरोधकांचा पराभव या निवडणुकीत विरोधी पक्षांना मोठा दणका बसल्याची बाब पत्रकारांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, या निवडणुकीत महाविकास आघाडी नेमकी खाली गेली आहे. कारण, त्यांच्या भूमिका चूकत आहेत. टीकाटिप्पणी करण्याच्या भूमिकेला आता महाराष्ट्र मत देत नाही. महाराष्ट्र विकासाला मतदान करतो. त्यामुळे टीकाटिप्पणीवर काही मतदान मिळणार नाही. निगेटिव्ह बोलून मतदान मिळणार नाही. काँग्रेसने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. शरद पवार महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यात कमी पडले. त्यांनी ते मार्गदर्शन केले असले तरी, त्यांचे निकाल अत्यंत वाईट आले आहेत. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. काँग्रेसच्या आतापर्यंत भूमिकाच चुकत आल्यात. त्यांच्या भूमिका या नकारात्मक आहेत. त्यांनी सकारात्मक प्रचार करण्याची गरज होती. विकासाच्या योजना मांडण्याची गरज होती. काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात वाईट आहे. कारण, त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. जिथे व्हिजन नाही, तिथे जनता नाही. जिथे व्हिजन आहे, तिथे लोकं आहेत. चंद्रपुरात विरोधी बाकावर बसण्याचे संकेत चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाच्या निवडीवरून मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप या प्रकरणी काही प्रयत्न करत आहे का? असा प्रश्नही पत्रकारांनी यावेळी बावनकुळेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, भाजपने असा विचार केला आहे की, कुणी आपल्यासोबत आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. पण कुणी आले नाही तर आम्ही विरोधी पक्षात बसू. आमची विरोधी पक्षातही बसण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर