ब्रेकिंग न्यूज
Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका…
SP News Maregaon

Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : आयएएस अधिकारी तुकराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धुरा हाती घेतल्यानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या आयएएस अधिकारी पदाच्या कार्यकाळात तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जातात. तुकाराम मुंढे हे एफडीएमध्ये आल्यानंतर या विभागाची चांगलीच चर्चा सुरू झाली. तर, दुसरीकडे एफडीएच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नव्हती का, असा सवालही उपस्थित होऊ लागला. याच प्रश्नावर तुकाराम मुंढे यांनी स्पष्टोक्ती केली आहे.

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी न्यूज १८ मराठीच्या बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी न्यूज १८ मराठीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना , "तुमच्याआधीचे किंवा इतर अधिकारी काम करत नव्हते का?" असा सवाल विचारला. त्यावर तुकाराम मुंढे यांनी अत्यंत संयमित आणि सकारात्मक भूमिका मांडली. तुकाराम मुंढे यांनी आधीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांनी प्रशासकीय बदलांची आणि कायद्यातील फरकाची सविस्तर माहिती दिली.

‘न्यूज १८ मराठी’सोबत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, "माझ्याआधीच्या अधिकाऱ्यांनी काम केले नाही, असे मुळीच म्हणता येणार नाही. त्यांनीही सिस्टीम उभी केली आहे आणि कारवाया केल्या आहेत, म्हणूनच आज आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही कुठेही व्हॅक्यूममध्ये (पोकळीत) जाऊन काम करत नाही."
कामाचा स्केल अन् स्पीड वेगळा असू शकतो!
तुकाराम मुंढे यांनी पुढे म्हटले की, कारवाईतील फरकाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे प्रमाण, वेग आणि प्रभाव हा कमी-जास्त असू शकतो. पूर्वी भेसळ प्रतिबंधक कायदा लागू होता, तर आता आपण अन्न सुरक्षा आणि मानके (Safety and Standards) कायद्यानुसार काम करत आहोत. काळानुसार सिस्टीम बदलली असून लोकांचा आणि प्रशासनाचा अप्रोच (दृष्टिकोन) बदलणे गरजेचे होते, असे त्यांनी म्हटले.

View this post on Instagram

A post shared by news18 Marathi (@news18marathi)

वेळेनुसार सुद्धा वेगळं काम करण्याची गरज होती. अगोदर आपण ज्याला भेसळ प्रतिबंधक कायदा होता, आता सेफ्टी अँड स्टँडर्डवरती आलेलो आहोत. त्याच्या दृष्टिकोनातून हे रि-ओरिएंटेशन, अप्रोच चेंज होणं गरजेचं होतं. म्हणून हा जो फरक आहे, तो कायद्यातला फरक आहे. कायद्यातील या बदलांमुळेच कामाच्या पद्धतीत फरक दिसून येतो, पण आधीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पायावरच आता नवीन टेक-ऑफ घेणे शक्य झाले आहे, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर