ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मान्सून पुन्हा सक्रिय!:राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; मध्य महाराष्ट्र अन् कोकणात जोर वाढणार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: रविवारी (28 जून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असेल,असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुण्यासह रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावेल. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 24 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे पावसाची पाठ; तब्बल 43.2% तूट जून महिना संपत आला तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सूनने अद्याप अपेक्षित जोर पकडलेला नाही. सुरुवातीला काही भागात तुरळक हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील एकूण सरासरी पावसात मोठी घट झाली आहे. महसूल विभागाच्या 27 जून 2०26 पर्यंतच्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्याचा सरासरी पाऊस 125.2 मिमी आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ 71.1 मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात तब्बल 43.2 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी राजा मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुकावार आकडेवारीवर नजर टाकल्यास, खुलताबाद तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून तिथे केवळ 33.4 टक्के पाऊस झाला (अर्थात 66.6 टक्के तूट) आहे. दुसरीकडे सोयगाव तालुक्यात सर्वाधिक 115.9 मिमी पाऊस झाल्यामुळे तेथील परिस्थिती तुलनेने चांगली आहे. जळगावात मान्सूनची आजपासून 4 जुलैपर्यंत सक्रियता‎ मान्सूनसाठी आता पुन्हा एकदा ‎‎अनुकूल वातावरण तयार होत ‎‎आहे. 28 जून ते 4 जुलै या ‎‎कालावधीत जळगाव जिल्ह्यात ‎‎मान्सूनची सक्रियता वाढण्याची ‎‎शक्यता हवामान खात्याने‎ वर्तवली आहे. आकाशात ढग‎जमा होत असल्याने पावसाची ‎‎हजेरी लागेल; मात्र हा पाऊस‎ सतत किंवा अतिजोरदार नसून, ‎‎तुरळक ते मध्यम स्वरूपाचा ‎‎राहील, असा अंदाज आहे. ‎‎‎आठवडाभर कमाल तापमान 33‎ते 37 अंश सेल्सिअसच्या ‎‎आसपास राहण्याची शक्यता ‎‎असल्याचे हवामान अभ्यासक ‎‎नीलेश गोरे यांनी सांगितले.‎ पुढील आठवड्यात हवेतील‎आर्द्रतेचे प्रमाण 5० ते 75‎टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.‎त्यामुळे नागरिकांना प्रचंड‎ उकाडा सहन करावा लागेल ‎आणि घामाचे प्रमाण वाढेल.‎ अकोला शहरात मुसळधार पाऊस,‎बळीराजा सुखावला‎ अकोला शहरासह जिल्हाभरात ‎शनिवारी (दि.27) सायंकाळी पाच‎ वाजेच्या सुमारास विजांच्या‎ कडकडाटासह जोरदार पावसाला ‎सुरुवात झाली. यामुळे शहरातील‎ विविध भागात पाणी साचले. ‎जोराच्या पावसासह विजांच्या‎ कडकडाटामुळे नागरिकांची भंबेरी‎ उडाली. पावसामुळे अकोला‎ शहरातील वीज काही काळ गेली ‎होती. काही ठिकाणी झाडांच्या ‎फांद्या कोसळल्या.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर