ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

दिव्य मराठीतर्फे दहावी-बारावीच्या गुणवंतांचा ‘प्रतिभा सन्मान 2026’:चारित्र्य आणि मूल्ये जपा, पोलिस उपायुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“चांगले करिअर आणि निरोगी आयुष्यासाठी चारित्र्य व मूल्ये जपा, कारण एक चुकीचा मित्र किंवा एक चुकीचा निर्णय आयुष्य वेगळ्या मार्गाला लावू शकतो,’ असा सल्ला परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी शनिवारी (२७ जून) येथे विद्यार्थ्यांना दिला. ‘दै. दिव्य मराठी’तर्फे आयोजित “दिव्य मराठी प्रतिभा सन्मान २०२६’या उपक्रमांतर्गत दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, यावेळी ते मार्गदर्शन करत होते. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा समारंभ पार पडला. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, उत्कर्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल पाथ्रीकर, ज्ञानसागर करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मनीष जैस्वाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षवर्धन शाही यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. अतुलकर म्हणाले, दहावी-बारावी हा आयुष्यातील करिअर घडवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बहुपर्यायी शिक्षण : कुलगुरू डॉ. सपकाळ
आता विद्यार्थ्यांना बहुपर्यायी शिक्षण घेण्याची संधी नवीन शैक्षणिक धोरणामुळे मिळाली आहे. त्याला हवे तेव्हा तो शिक्षण घेऊ शकतो. उच्च शिक्षणात तुम्हाला जे आवडते तेच निवडा. ग्लोबल स्पर्धा आणि तंत्रज्ञानासाठी आपल्यातील कौशल्य विकसित करा. असे कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी सांगितले. परीक्षा आत्मविश्वासाने द्या : लाठकर परीक्षा अभ्यासाची असो वा जीवनाची. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. स्वप्न मोठी पाहा. पालकांनी आपल्या पाल्याची तुलना कुणाशी करू नये. अवास्तव अपेक्षा मुलांवर लादू नका. त्यांना आत्मविश्वासाने वावरण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले. संधीचा उपयोग करा : डॉ. गाडेकर परीक्षा हा एक टप्पा आहे. त्याचा बाऊ करू नका. मिळणारा प्रत्येक क्षण जगा. संधी मिळेल तेथे गुणवत्ता दाखवा. प्रवास करा. तणावापासून दूर राहा. प्रवासामुळे तुम्हाला अनुभवासोबत बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, असे डॉ. गाडेकर यांनी सांगितले. शिक्षणाला एन्जॉय करा : डॉ. जैस्वाल डॉ. जैस्वाल म्हणाले की, जे आवडते त्याची यादी करा. मला जे जमत नाही त्याचीही यादी करा. नंतर स्वत:ला विचारा मी काय करू शकतो. कुणीही हुशार किंवा ‘ढ’ नसतो. प्रत्येकात एक गुण असतो. परीक्षा ही आयुष्याची संधी माना. शिक्षणाला एन्जॉय करा, घाबरू नका. असा सल्ला त्यांनी दिला. ताण न घेता, मेहनत करा : डॉ. पाथ्रीकर सोशल मीडिया पिढी खराब करतो आहे. याचा अभ्यासावर, आरोग्यावर परिणाम होतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव आहे. तो राहणारच आहे, पण त्यावर वेळीच नियंत्रण मिळवल्यास तुम्ही तणावापासून दूर राहू शकता. त्यासाठी वेळ, ताणतणाव व्यवस्थापन करा, असे डॉ. पाथ्रीकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांनी दिलेल्या टिप्स… यशासाठी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वास बाळगा पालकांनी आपल्या पाल्याची इतरांशी तुलना करू नका. प्रत्येक विद्यार्थी त्याची गुणवत्ता वेगळी आहे. परीक्षा पहिला टप्पा आहे वाचनाची सवय ठेवा. शिक्षणाला एन्जॉय करा, घाबरू नका.‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर