ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

अमरावतीच्या ‘फिशरीज हब’ प्रकल्पाला गती:विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मनपात पोहोचून घेतला आढावा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात आज, मंगळवारी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत आयोजित या बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मत्स्य विभाग व महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले. विशेषतः पाण्याच्या टाकीचे बांधकाम व अन्य आवश्यक विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. दरम्यान प्रकल्पाच्या उर्वरित विकासकामांबाबत आणि तांत्रिक बाबींवर आवश्यक तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासंदर्भातील बहुतांश कामे पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.या प्रकल्पाचे प्रभावी संचालन, आरएफटी/ईओआय प्रक्रिया व भविष्यातील कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. ही समिती आगामी १५ जूनपर्यंत सविस्तर अहवाल सादर करणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, नोडल अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता संजय लेवरकर, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जि.प. च्या तलावांतील मासे घेणार जिल्हा परिषदेमार्फत बारमाही तलावांमध्ये उत्पादित होणारे मासे या प्रकल्पाशी जोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर