ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

पाऊसमान अकोल्यातील मुळा खोऱ्यात आनंद! आंबित ओव्हरफ्लो:गतवर्षीपेक्षा महिनाभर उशीर, तरीही प्रथम भरण्याचा मान कायम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोले तालुक्याच्या मुळा खोऱ्यातील दुर्गम आदिवासी भागासाठी रविवार, २८ जूनचा दिवस मोठा आनंदाचा ठरला. मुळा नदीवरील अंबित लघुपाटबंधारे जलाशय पूर्ण १९१ दशलक्ष घनफूट क्षमतेने भरून सकाळी सांडव्यावरून ओव्हरफ्लो झाला. यंदा मान्सूनने सुरुवातीला ओढ दिली असली, तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने अंबित जलाशय तुडुंब भरल्याने संपूर्ण मुळा नदीखोऱ्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. अकोले तालुक्यातील सर्व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये अंबित जलाशय दरवर्षी सर्वप्रथम भरण्याचा मान राखतो. यंदा २८ जूनला तो ओव्हरफ्लो झाला. २०२५ मध्ये हा जलाशय २८ मे रोजी, तर २०२४ मध्ये ४ जुलै रोजी पूर्ण भरला होता. यंदा पावसाने दडी मारल्याने मागील वर्षाच्या तुलनेत एक महिना उशिराने जलाशय भरले, तरीही पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. तालुक्यात अद्याप समाधानकारक मान्सूनचा पाऊस झालेला नाही. आता या पाण्यावरच सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील भात खाचरांतून खरीप हंगामातील भात, नाचणी, वरई यांसारख्या पारंपरिक पिकांच्या लागवडीस आदिवासी भागात सुरुवात होईल. दुर्गम भागातील शेती प्रामुख्याने पावसावरच अवलंबून असल्याने जलाशय भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांडव्यावरून ओसंडून वाहणाऱ्या अंबित जलाशयाचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पांढऱ्याशुभ्र दुधासारख्या धारा सांडव्यावरून कोसळताना पाहून लहानथोरांनी आनंद व्यक्त केला. उशिरा का होईना, पण पावसाळ्यात सर्वप्रथम अंबितने दिलेल्या या जलदेणगीमुळे मुळा खोऱ्यातील शिवार पुन्हा हिरवाईने नटण्यास सज्ज झाले आहे. पिंपळगावखांड धरणाकडे पाण्याचा प्रवास अंबित जलाशयाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी मुळा नदीपात्रातून थेट पिंपळगावखांड जलाशयात जमा होत आहे. पिंपळगावखांड जलाशयातून पुढे ते राहुरी तालुक्यातील ज्ञानेश्वर सागरात (मुळा धरणाकडे) झेपावते. अंबित भरल्याने आता पिंपळगावखांड धरण भरण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळा नदीपात्रातील वाढत्या पाणीपातळीमुळे परिसरातील विहिरींची पातळी वाढणार असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर