ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उसनवारीच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या:तिघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील निवडुंगे येथील बाळासाहेब कुंडलिक ढवळे (वय ३५) यांना भिशी आणि उसनवारीच्या पैशांवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींची सुरुवातीला २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती, ज्याची मुदत संपल्यानंतर आता आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. याप्रकरणी आबिद आसिब शेख (वय ५५), नईम अस्लम ऊर्फ बब्बूभाई शेख (वय ३०) आणि रफिक ऊर्फ कालू अस्लम ऊर्फ बब्बूभाई शेख (वय २७, सर्व रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, मयत बाळासाहेब ढवळे यांनी एक भिशी सुरू केली होती. या भिशीचे सदस्य असलेल्या तिन्ही आरोपींनी भिशीचे पैसे उचलल्यानंतर ते परत भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी भिशीतील इतर सदस्यांनाही पैसे भरण्यापासून परावृत्त करून बाळासाहेब यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, बाळासाहेब ढवळे यांनी आरोपी नईम शेख याला हॉटेल व्यवसायासाठी सुमारे सात लाख रुपये उसनवारी म्हणून दिले होते. हे पैसे जेव्हा बाळासाहेब यांनी परत मागितले, तेव्हा आरोपींनी ते देण्यास साफ नकार दिला. या आर्थिक कोंडीमुळे आणि आरोपींकडून सातत्याने मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून बाळासाहेब ढवळे यांनी १६ जून रोजी रात्री विषारी औषध प्राशन केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना, दुर्दैवाने १७ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मयताचे भाऊ महेश कुंडलिक ढवळे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून आरोपींचा शोध सुरू केला आणि १९ जून रोजी पहाटेच तिन्ही आरोपींना अटक केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर