ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जि.प. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघ कटिबद्ध:नांदगाव पेठ येथे माजी विद्यार्थी संघाची बैठक ठरली दिशादर्शक‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव पेठ येथील माजी विद्यार्थी संघाची पहिली बैठक शाळेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. या बैठकीत गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाने पुढाकार घेणे, एमआयडीसी परिसरातील कारखानदारांना भेटी देऊन सीएसआर फंडातून शाळेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध विषयांवर व्यवसाय मार्गदर्शन व प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करणे आदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नितीन हटवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला सचिव तथा प्राचार्य देवेंद्र ठाकरे, अरुण राऊत, तिरमनदास कापडे, दिनकर सुंदरकर, प्रा. मोरेश्वर इंगळे, मंगेश तायडे, दिलीप चौधरी, मनोज मोरे, विजय कापडे, नीरज दारोकार, उद्धव पांढरीकर, किशोर राऊत, विनोद गभने, सुनील धर्माळे, निलेश सरोदे, अतुल राऊत आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाने स्थापनेच्या दिवशी शाळेच्या विकास कामांचा तसेच स्वातंत्र्यसंग्राम सेनानी वीर केसरीसिंह रघुवंशी यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा हाती घेतला होता. नितीन हटवार यांनी घेतलेल्या पुढाकाराने तसेच संकल्पनेनुसार दीर्घकाळानंतर जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील स्वतंत्र संग्राम सेनानी वीर केसरीसिंह रघुवंशी यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी यांनी निधी उपलब्ध करून दिला. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून हे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या यशस्वी उपक्रमासाठी अध्यक्ष नितीन हटवार व माजी विद्यार्थी संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर