ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

नरहरी झिरवाळांना आक्षेपार्ह व्हिडिओची आधीच होती कल्पना:’बॉम्ब’ फुटण्यापूर्वीच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा आक्षेपार्ह कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओची माहिती झिरवाळ यांना आधीपासूनच होती आणि यासंदर्भात त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चाही केली होती, अशी माहिती मिळत आहे. मात्र, ही चर्चा होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नरहरी झिरवाळ यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील एका खोलीत झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बिछान्यावर बसलेले असून शेजारी मद्य आणि खाद्यपदार्थ दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारा तृतीयपंथी पवन यादव असून, त्याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्यांच्या शासकीय निवासात अशा प्रकारची व्यक्ती असणे आणि तिथे अश्लील कृत्य होणे, यावरून आता नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील गटबाजी? राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षात नेतृत्वावरून आणि मंत्रिपदावरून मोठा संघर्ष सुरू आहे. झिरवाळ यांनीच सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. तसेच, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याबाबत अजितदादा सकारात्मक होते, असा दावाही त्यांनी केला होता. मंत्रिमंडळातील त्यांच्या जागेवर डोळा असलेल्या पक्षातीलच काही हितशत्रूंनी त्यांना जाळ्यात ओढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडून हकालपट्टीची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा कलंकित मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर होते. या संपूर्ण प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधला असता, “साहेबांना या विषयावर सध्या काहीही बोलायचे नाही,” असे सांगण्यात आले. झिरवाळांवर संकटांची मालिका, तिसरा बळी ठरणार? नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत गेल्या काही काळापासून सतत वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. आता तृतीयपंथीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ चर्चेत आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. याआधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने मंत्रिपद सोडावे लागले होते. तर अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकरणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता व्हिडिओ प्रकरणामुळे झिरवाळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यास, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर