ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मान्सून . सुटीच्या दिवशी पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका:जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दमदार, तर काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर २२ जूनपासून अहिल्यानगर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पावसाचे वितरण संमिश्र असले तरी, ज्या भागात पाऊस बरसला, तिथे शेतीच्या मशागतीच्या कामांनी चांगला वेग घेतला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. सकाळी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सूर्यदर्शन अशा स्थितीत दुपारी ४ नंतर पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी सावेडी, केडगाव, बालिकाश्रम रोड आणि भिंगार परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, या हजेरीमुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा सुखद ठरला आहे. ग्रामीण भागात नेवासे तालुक्यातील सोनई, वडाळा, घोडेगाव, शिंगवे तुकाई, घोडेगाव एमआयडीसी परिसरात सर्वदूर पाऊस झाला आहे. मात्र, शिर्डीसह पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि पारनेर तालुक्यातील अनेक भागांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. २८ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ५१.२% पाऊस झाला. काही तालुक्यांत स्थिती चिंताजनक आहे. कर्जत (१३०.१%) आणि जामखेड (१०६.८%) तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून दमदार पाऊस झाला आहे. राहुरी (६.७%), अकोला (११.३%) आणि संगमनेर (१६.२%) तालुक्यांत पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यासह परिसराची वाटचालही संथ (सुमारे २७%) सुरू आहे. नगर, श्रीगोंदे, पाथर्डी आणि नेवासे या तालुक्यांमध्ये मात्र ५० ते ६८ टक्क्यांपर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. हवामान खात्याचा यलो अलर्ट हवामान खात्याने जिल्ह्यात २८ जून ते २ जुलैदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. या चार दिवसांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम पाऊस आणि ३०-५० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर