ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर लोढांची तोफ; ‘फूट डालो’ धोरणावर प्रहार

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा ‘हिंदू अस्मिते’चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या ‘फूट डालो आणि राज करो’ या कुटिल नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे,” अशा जळजळीत शब्दांत लोढा यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विभाजनाचे राजकारण आणि लोकसंख्येची घटती आकडेवारी दक्षिण भारताचे उदाहरण देत लोढा यांनी धक्कादायक वास्तव समोर ठेवले. एकेकाळी दक्षिण भारतात २२ ते २३ टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ ३ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लीम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले, मात्र हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करून कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. जैन मुनींशी चर्चा; कायदेशीर प्रक्रियेचे संकेत हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरू असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे सूतोवाचही त्यांनी दिले आहे. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा ‘आम्ही हिंदू’ ही भावना प्रबळ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय अनागोंदी की राजकीय अजेंडा? पत्रकारांशी संवाद साधताना लोढा यांचा सूर केवळ धार्मिक नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारणारा होता. “ज्या जैन समाजाने जगाला अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला, त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे करणे हा सांस्कृतिक द्रोह आहे,” असे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. आता चेंडू जैन समाजाच्या आणि सरकारच्या कोर्टात असून, या विधानाचे पडसाद आगामी काळात उमटणार हे निश्चित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर