ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

दिव्य मराठी प्रयोग:घरी बनवलेला शुद्ध खवा 350 रुपये किलो, बाजारात 260 रुपयांचा भाव; ग्राहकांनो तुम्हीच ठरवा बाजारात मिळणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी ६०० निकृष्ट पेढा अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट खव्यापासून बनवलेल्या पेढ्यांची सर्रास विक्री होत असल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेतला. तिथे सर्रास २६० ते २७० रुपये किलो दराने खवा उपलब्ध असल्याचे दिसले. जर १ किलो शुद्ध खवा बनवायला (मजुरी वगळता) ३५० रुपये खर्च येत असेल, तर बाजारात यापेक्षा स्वस्त दराने मिळणारा खवा नेमका कशापासून बनवला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘दिव्य मराठी’ने ४५ रुपये प्रति लिटर दराने गाईचे दूध खरेदी केले. त्यापासून विनाभेसळ खवा तयार करण्यासाठी किती खर्च येतो, याचे लाईव्ह प्रात्यक्षिक केले. त्यातून वास्तव समोर आले. यापेक्षाही स्वस्त अर्थात ३५ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करून इंधन, नफा व वाहतूक खर्च जोडला तरी, २६० रुपये किलो दराने विक्री करणे परवडणारा नाही. भेसळीचे गुजरात व कर्नाटक कनेक्शन वांरवार उघड १) नोव्हेंबर २०२१ : ट्रॅव्हल्सद्वारे गुजरातहून आणलेला १३०० किलो भेसळयुक्त खवा अहिल्यानगरमध्ये जप्त. २) ऑक्टोबर २०२३ : छत्रपती संभाजीनगर येथे वेदांतनगर पोलिसांनी १८० किलो खवा जप्त केला. हा खवा अहमदाबाद येथून आणला गेला होता. ३) सप्टेंबर २०२३ : अहमदाबाद येथून बसने महाराष्ट्रात विक्रिसाठी आणलेला ५ हजार ३४० किलो खवा जप्त केला होता. ४) ऑक्टोबर २०२४ : ३५०० किलो खवा कर्नाटक राज्यातून अमरावतीत आणल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. ५) शिर्डी : २४ जून २०२६ रोजी ६०० किलो पेढा जप्त करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर