ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मंगळवेढ्यात 10.87 लाखांचा भेसळयुक्त खताचा साठा जप्त:कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात कारवाई

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पाटखळ येथे कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १० लाख ८७ हजार ५७५ रुपयांचा भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्र चालक सतीश मनोहर भोसले (रा. पाटखळ, ता. मंगळवेढा) व अवधूत अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीचा संचालक रविराज शंकर कणसे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाटखळ- मंगळवेढा मार्गावरील पेट्रोल पंपाजवळील प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या पथकाने ८ जून रोजी सायंकाळी अचानक तपासणी केली. दुकान व गोदामाची पाहणी करताना अनेक गंभीर अनियमितता व त्रुटी आढळून आली. संबंधित विक्रेत्याकडे विक्री परवान्यात नमूद नसलेल्या कंपनीची खते आढळून आली. खतसाठा अनधिकृत गोदामात ठेवला होता. साठा नोंदवही अद्ययावत नव्हती. खत साठा फलक व दरसूची प्रदर्शित करण्यात आली नव्हती. खत विक्रीच्या एम-फॉर्म बिलाच्या प्रती उपलब्ध नव्हत्या. ई-पॉस मशीनही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. विविध खतांचा साठा जप्त तपासणी दरम्यान अवधूत अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि., सातारा या कंपनीच्या नावावरील अमोनियम सल्फेट, वॉटर सोल्युबल खतांचे विविध प्रकार, फॉस्फरिक अॅसिड, झिंक सल्फेट, कॉम्बी किट यासह विविध रासायनिक खतांचा १० लाख ४६ हजार ७८० रुपयांचा साठा जप्त केला. याशिवाय अन्य कंपन्यांची सुमारे ४० हजार ७९५ रुपयांची खते देखील मिळाली. तपासणी दरम्यान परवाना क्रमांकात तफावत आढळून आली. संबंधित कंपनीच्या संचालकाच्या विक्री परवान्याचा क्रमांक व प्रत्यक्ष खतांच्या पोत्यांवर छापलेला परवाना क्रमांक यामध्ये तफावत आढळली. आयात केलेल्या कच्च्या मालाची आवश्यक बिले सादर करण्यात संचालक अपयशी ठरल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अमोनियम सल्फेट, वॉटर सोल्युबल खतांचे नमुने सीलबंद करुन तपासणीसाठी पुण्यातील खत विश्लेषण प्रयोग शाळेला पाठवले. जप्त साठा इतरत्र हलवण्यास अथवा विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला. खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार कृषी केंद्राला विक्री परवाना निलंबित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर