ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोगच हटके, काकडीची लागवड केली यशस्वी, 40 दिवसांत लाखात कमाई

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : शेतीमधून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतो आणि प्रचंड मेहनत घेत असतो. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी गंगाधर म्हमाणे यांनी करून दाखवला आहे. त्यांनी आपल्या शेतात केलेल्या काकडीच्या लागवडीतून अवघ्या 40 दिवसांत तब्बल 1 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. बाजारपेठेत असाच दर टिकून राहिला, तर या हंगामात 10 लाख रुपयांपर्यंत नफा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

​4 एकरांत बेल्ली जातीची लागवड

​गंगाधर म्हमाणे यांनी आपल्या 4 एकर शेती क्षेत्रामध्ये बेल्ली या वाणाची काकडी लागवड केली आहे. लागवडीनंतर साधारण 42 दिवसांनी पिकाची काढणी सुरू झाली असून, आतापर्यंत काकडीचे दोन तोडे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. या संपूर्ण लागवडीसाठी त्यांना सुमारे दीड लाख रुपये खर्च आला होता. विशेष म्हणजे, पहिल्याच तोडणीमध्ये काकडी लागवडीचा सर्व खर्च निघून गेला आहे, अशी माहिती म्हमाणे यांनी दिली.

प्रमुख शहरांतील बाजारात मागणी

​मोहोळ येथील शेतात पिकलेली ही काकडी केवळ स्थानिक बाजारातच नव्हे, तर पुणे, मुंबई, सोलापूर आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमधील बाजारात विक्रीसाठी पाठवली जात आहे. सध्या बाजारात काकडीला चांगला भाव मिळत असून, हेच दर टिकून राहिल्यास 4 एकरांतून 10 लाखांचा निखळ नफा हातात येईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

​कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा मार्ग

​काकडी हे पीक अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. या पिकाच्या लागवडीला आणि फवारणीला इतर पिकांच्या तुलनेत खूप कमी खर्च येतो. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीदेखील काकडीची लागवड करून अधिकाधिक नफा मिळवावा, असे आवाहन शेतकरी गंगाधर म्हमाणे यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर