ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

घोडदरा येथे सर्पदंशाने अल्पभूधारक शेतकरी महिलेचा मृत्यू

2.3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

मारेगाव : सुरेश पाचभाई

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. शितल नंदकिशोर मिलमिले (वय अंदाजे ३२), रा. घोडदरा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने घोडदरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शितल मिलमिले या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

शितल मिलमिले यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्या पतीच्या नावावर सुमारे तीन एकर सामायिक शेती असल्याची माहिती आहे. शेतीसोबतच रोजंदारी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. अशा परिस्थितीत कुटुंबातील कर्त्या महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे.

मृत शितल मिलमिले यांच्या पश्चात पती, सासू, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढतो
पावसाळ्यात शेतशिवारात सापांचा वावर वाढत असल्याने शेतकरी व शेतमजुरांनी शेतात काम करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. शेतात जाताना बूट किंवा गमबूट वापरणे, झुडपे अथवा गवतामध्ये हात घालताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपचार न करता वेळ न दवडता तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन करण्यात येत आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर