ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

Ganpatipule: पर्यटकांसाठी खूशखबर! गणपतीपुळे समुद्रकिनारा अखेर खुला, पण…

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गणपतीपुळे: जगभरातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र म्हणून गणपतीपुळे हे ठिकाण ओळखलं जातं. गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी महाराष्ट्रातूनच नाही तर अगदी परदेशातून देखील पर्यटक आवर्जून येतात. याच पर्यटकांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या 60 दिवसांपासून बंद असणारा गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. पावसाचा जोर कमी होत असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन 24 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेत किनारा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पावसाळ्यात गणपतीपुळे परिसरातील समुद्र अधिक खवळतो. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. याच कारणास्तव 26 जूनपासून समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. आता पावसाचा जोर कमी झाला असून समुद्रकिनाऱ्याचा धोका देखील कमी झाला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे समुद्रकिनारा खुला करण्याची मागणी केली होती.

दीड तास वाया घालवण्याची गरज नाही! मुंबईकरांसाठी नवा मार्ग ठरणार गेमचेंजर; 10 मिनिटांत पोहोचणार, वाचा कसा असेल प्रकल्प?

गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी, 24 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी मागणी लावून धरली. अखेर ग्रामपंचायतीने सोमवारी दुपारपासूनच हा किनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, समुद्रकिनारा खुला करण्याचा निर्णय झाला असला तरी पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात खोल पाण्यात उतरू नये. जीवरक्षक आणि पोलीस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर