ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून ITBP जवान निकेश पुनवटकर यांचे आकापुरात भव्य स्वागत

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मातृभूमीच्या सुपुत्राच्या आगमनाने गावात उत्साहाचे वातावरण; ग्रामस्थ व उन्नती महिला शेतकरी समूहाकडून जंगी सत्कार

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील सुपुत्र निकेश बंडूजी पुनवटकर यांनी भारतीय सुरक्षा दलातील भारत-तिबेट सीमा पोलीस दलात (ITBP) निवड झाल्यानंतर सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर आज, सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता, ते आपल्या जन्मगावी आकापुर येथे दाखल होताच गावकऱ्यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात व जल्लोषात भव्य स्वागत केले.

उत्तराखंड येथे भारतीय सुरक्षा दलात निवड झालेल्या निकेश पुनवटकर यांच्या यशामुळे आकापुर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला यश मिळाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वेळी समस्त गावकरी आकापुर तसेच उन्नती महिला शेतकरी समूह, आकापुर यांच्या वतीने निकेश पुनवटकर यांचा जंगी सत्कार करण्यात आला. गावातील नागरिक, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या देशरक्षक सुपुत्राचे अभिनंदन केले. स्वागत सोहळ्यामुळे गावात देशभक्तीचा उत्साह संचारला होता.


“गावचा एक सुपुत्र देशाच्या सीमा सुरक्षेसाठी सज्ज झाला असून, निकेश पुनवटकर यांच्या यशाचा प्रत्येक आकापुरवासीयाला अभिमान आहे,” अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
निकेश पुनवटकर यांच्या या उल्लेखनीय यशाने परिसरातील युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, त्यांच्या भावी देशसेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर