ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

शिंदेसेनेकडून बाजोरीया यांचा पत्ता कट:अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नावाची घोषणा, महायुतीत धुसफुसीची चिन्हे

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदेसेनेतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचा पत्ता कट होऊन शिंदेसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे आता महायुतीत मतदानावरून धुसफूस होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेने सोडवून घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजोरीया यांचे नांव पुढे आले होते. बाजोरीया यांनी देखील मतदारांशी संपर्क साधून आपण रिंगणात उतरणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर माजीमंत्री अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनीही उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यामुळे खोतकर की बाजोरीया यापैकी एका नावावरच अंतिम निर्णय होणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, शिंदेसेनेच्या नेत्यांनीही नेमके कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ही बाब अतिशय गोपनिय ठेवली होती. त्यातच खोतकर यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहिर केल्यानंतर बाजोरीया यांनाच उमेदवारी मिळेल असा कयास राजकिय वर्तुळातून बांधला जाऊ लागला होता. त्यातून काही मतदारांनी बोजारीया यांच्याशी संपर्कही साधून आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेनेत नाट्यमय घडामोडी झाल्या अन अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी दिली जात असल्याचे जाहिर केले. त्यानुसार सईद खान यांनी महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. ऐनवेळी सईद खान यांची उमेदवारी जाहिर झाल्याने आता महायुतीमधील पक्षातील मतदारांना पक्षादेश पाळावा लागणार आहे. त्यामुळे हि निवडणुक ‘कोरडी‘ जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांची फोडाफोडी होणार असल्याचे बोलले जात असून महायुतीमधील अंतर्गत धुसफुस उमेदवारासाठी अडचणीची ठरणार असल्याचे राजकिय वर्तुळातून बोलले जात आहे. त्यामुळे आता मतदारांच्या ‘धना‘ वरच निवडणुकीत जय पराजयाचे गणित अवलंबून असणार असल्याचे चित्र आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर