ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी बोलता आलीच पाहिजे:खतांच्या किमतीत 45 टक्क्यांपर्यंत वाढ, किमती कमी करून तातडीने सबसिडी द्या- अनिल देशमुख

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऑटो-टॅक्सी चालकांना थोडी फार तरी मराठी बोलता आली पाहिजे. आम्ही ते सुद्धा बोलणार नाही अशी कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे. 1 मे पासून हा नियम लागू होणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. 8 ते 10 वाक्य शिकायला 2 दिवसांमध्ये कोणीही शिकू शकतो. महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठी भाषा शिकायला कोणाला अडचण असू नये. त्यांना काही मराठीमध्ये निबंध लिहायला लावणार नाही, ते मान्य केले तर हा प्रश्न सुटू शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणाले की, खताच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. 25 ते 45 टक्क्यापर्यत खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली करण्यात आली आहे. 20-20-0 खताच्या किंमतीमध्ये 25 टक्के तर 24-24-0 खताच्या किंमतीमध्ये जवळपास 23 टक्के वाढ झाली आहे. एमओपीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, अशा पद्धतीने खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारने खतांच्या किमती कमी करत त्यावर सबसिडी दिली पाहिजे. ..तर कारखानदारांवर कारवाई करावी अनिल देशमुख म्हणाले की, खत टंचाई किंवा दरवाढीसाठी कृषी केंद्र चालकांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र मूळ दोषी हे कारखानदार आहेत. खत खरेदी करताना लिंकिंगचा प्रकार केला जावू नये. कारण यामध्ये केवळ कृषी सेवा केंद्रांना दोषी धरले जाते. पण खरे दोषी हे कारखानदार आहेत ते कृषी सेवा केंद्राना लिंकिंग करायला भाग पाडतात. कृषी केंद्रावर कारवाई न करता कारखानादारावर कारवाई केली तर यावर आळा बसेल. कडूंना सल्ला देण्याची आवश्यकता नाही अनिल देशमुख म्हणाले की, बच्चू कडू हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जमिनीवर काम करत आहेत. बच्चू कडू यांना सल्ला देण्याची काही गरज नाही. विधान परिषदेसंदर्भात ते योग्य तो निर्णय घेतील. पक्ष विलीन करण्यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर