ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यातील पांडव देवी येथे कावड यात्रा दाखल

817 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव, दि. २४ ऑगस्ट : पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील काही नवयुवकांनी आयोजित केलेली कावड यात्रा आज, सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मारेगाव तालुक्यातील पांडव देवी मंदिर परिसरात दाखल झाली. यावेळी **‘हर हर महादेव’**च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.

ही कावड यात्रा शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी दहेगाव येथून प्रारंभ झाली. अनेक अडचणी, थकवा आणि कष्ट सहन करीत शिवभक्तांनी पायी प्रवास पूर्ण केला. भगवान महादेवाच्या चरणी पवित्र जल अर्पण करण्याच्या श्रद्धेने आयोजित करण्यात आलेली ही यात्रा भक्तांसाठी आध्यात्मिक साधना आणि समर्पणाचे प्रतीक ठरली.

कावड यात्रा म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नसून श्रद्धा, साधना, संयम, सेवा, आरोग्य आणि एकतेची यात्रा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कावड खांद्यावर घेताना केवळ पाण्याचा भार वाहिला जात नाही, तर मनातील अहंकार, नकारात्मकता, व्यसन, आळस आणि स्वार्थ बाजूला ठेवण्याचा संकल्पही केला जातो, असे शिवभक्तांनी सांगितले.

कावडीत वाहून आणलेले पवित्र जल शिवलिंगावर अर्पण करणे हे शिवचेतना व कल्याणाचे प्रतीक मानले जाते. पायी प्रवास तपश्चर्या व संयमाची शिकवण देतो, तर जलाभिषेक समर्पणाची भावना दृढ करतो. कावड यात्रेमुळे श्रद्धा व समर्पणाची ताकद वाढण्याबरोबरच शारीरिक व मानसिक सहनशक्ती, व्यसनमुक्ती, सदाचार, पर्यावरण व जलस्रोत संवर्धनाचे महत्त्व तसेच एकता, प्रेम, बंधुभाव आणि समाजसेवेचे संस्कार रुजतात.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार सागर दांनडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दत्तू किनाके व सागर दिपेवार आदींनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.

युवा मंडळ जळका यांच्या वतीने कावड यात्रेतील सर्व शिवभक्तांचे व भाविकांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. पवित्र श्रावण महिन्यात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही कावड यात्रा परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर