ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

खापरी येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू

1.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील  खापरी येथील शेतकरी किसन सिताराम कुचनकार यांच्या बैलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

किसन कुचनकार यांचे खापरी परिसरातील शेत गट क्रमांक १७ मध्ये शेत आहे. शेतातील गोठ्यासमोर बैलाला सापाने दंश केल्याची प्राथमिक माहिती असून, त्यानंतर बैलाची प्रकृती गंभीर झाली आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.

शेतीकामासाठी उपयुक्त असलेल्या बैलाच्या अचानक मृत्यूमुळे कुचनकार कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेची संबंधित पशुसंवर्धन व महसूल विभागाने नोंद घेऊन पंचनामा करावा तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी किसन सिताराम कुचनकार यांनी केली आहे.

दरम्यान, सर्पदंशामुळेच बैलाचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी पशुवैद्यकीय तपासणी व संबंधित विभागाच्या अहवालानंतर होणे अपेक्षित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर