ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Yuvraj Singh Manchanda murder case : एकीकडे गँगरेपच्या केसेसमुळे दिल्ली हादरली असताना दुसरीकडे आता दिल्लीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुडगावला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या 31 वर्षीय एचआर व्यावसायिकाची कथितरित्या हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी युवराज सिंग मनचंदा यांच्या कथित हत्येप्रकरणी त्यांची माजी सहकारी अन्या वत्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांना अटक केली आहे. या हत्येमागे आर्थिक वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेत मन हेलावून टाकणारी स्टोरी समोर आलीये.
लग्नाची खरेदी करण्यासाठी गेला अन्…
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज लग्नाची खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. याच दरम्यान, त्याचे अन्या आणि संयम यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्या मानेवर दोन गोळ्या झाडून त्याला ठार केले. त्यांनी त्याचा मृतदेह सात तास त्यांच्या क्रेटा कारमध्ये ठेवला. नंतर त्यांनी तो सेक्टर 70 मधील एका गटारात फेकून दिला आणि उत्तराखंडला पळून गेले. पोलिसांनी उत्तराखंडमधून त्या दोघांना अटक केली आहे.
पाच दिवस काहीच पत्ता नाही
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज सिंग मनचंदा 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये आपल्या बहिणीसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला होता. वराजने आपल्या बहिणीला सांगितले की त्याची गुरुग्राममध्ये एक मीटिंग आहे आणि तो रात्री 10 वाजेपर्यंत घरी परत येईल. युवराज रात्र होईपर्यंत घरी परतला नाही. त्याचा फोन बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. पाच दिवस त्याचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
सीडीआर रिपोर्टमधून आरोपींचा शोध
युवराजच्या फोनच्या सीडीआर रिपोर्टमधून समोर आलं की, युवराजने त्याची पूर्वीची ऑफिस सहकारी, अन्या वत्स हिच्याशी संवाद साधला होता. त्यांनतर पोलिसांनी अन्याशी संपर्क केला, तेव्हा तिच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला अन् पोलिसांनी प्रकरण पालथं घातलं. त्यानंतर खरी घटना समोर आली आहे. चौकशीदरम्यान, अन्या आणि संयम यांनी युवराज सिंग मनचंदा यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर