ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पत्नीच्या किडनी दानावर शिवदीप लांडेंची मन हेलावणारी प्रतिक्रिया:किडनी दानाने वडिलांना दिलं आयुष्य; लांडेंचा भावनिक खुलासा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईत शिंदे गटाचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर सोमवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या शिवतारे यांची दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिस घ्यावे लागत होते. अशा परिस्थितीत त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी पुढाकार घेत स्वतःची किडनी वडिलांना दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वडिलांना नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त होत असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उपचारांनंतर अखेर सोमवारी ही शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर विजय शिवतारे आणि ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. वडिलांसाठी मुलीने केलेल्या या त्यागामुळे समाजातूनही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. दरम्यान, ममता शिवतारे या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी असून, त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पत्नीबद्दल अत्यंत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये आपल्या आयुष्यातील अनेक संकटांचा उल्लेख करत, मी अनेक कठीण प्रसंगांना सामोरा गेलो, पण तुझ्या एका निर्णयाने मला आतून हलवून टाकलं, असे त्यांनी म्हटले आहे. वडिलांना नवजीवन देण्यासाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवदीप लांडे यांनी पुढे लिहिले की, गेल्या तीन महिन्यांपासून शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या तपासण्या, कागदपत्रांची प्रक्रिया आणि कायदेशीर अडचणी ममता यांनी एकट्याने सांभाळल्या. त्या सर्व प्रक्रियेत ते फक्त एक साक्षीदार म्हणून उभे होते. देव मुलगी का देतो, याचे उत्तर मला आज मिळाले, असे म्हणत त्यांनी मुलीच्या निःस्वार्थ प्रेमाचे कौतुक केले. मुलगी ही देवाची सर्वात मोठी देणगी आयसीयूमध्ये पत्नीच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहताना भावनांना आवर घालता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. नात्यांमध्ये अनेकजण साथ सोडू शकतात, पण मुलगी मात्र ठाम उभी राहते, असे ते म्हणाले. ममता शिवतारेंच्या या निर्णयामुळे, मुलगी ही देवाची सर्वात मोठी देणगी आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर