ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सांगली: गेल्या काही काळापासून सांगलीत चोरीच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. आता चोरट्यांनी कहरच केला असून एचडीएफसी बँकेचं एटीएम मशीनच लांबवलं. सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम कॉलेजसमोर ही खळबळजनक घटना घडली. या मशीनमध्ये 10 लाख 34 हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणात एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा. लि. चे स्थानिक प्रतिनिधी विकास आमनगी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांत बँकेची एटीएम मशीन्स बसवली जातात. कंपनीकडून सांगली जिल्ह्यात देखील 40 एटीएम मशीन बसवण्यात आल्या आहेत. त्यातील सांगली शहरात 35 मशीन आहेत. मात्र, एकाही एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नियुक्त केलेला नाही.

‘तू लई नियमानं वागतोस…’; 6 कैदी थेट केबिनमध्ये घुसले, तुरुंग अधिकाऱ्यालाच…, कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात भयंकर थरार

एटीएम मशीनच पळवलं

मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरटे एटीएम समोर आले आणि सुरक्षारक्षक नसल्याचे पाहून आत घुसले. वायरी तोडून थेट मशीन घेऊनच पसार झाले. बुधवारी सकाळी गावातील एटीएम केंद्रातून मशीन चोरीला गेल्याचे समजले. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनच पळवल्याने परिसरात खळबळ उडाली. तेव्हा घटनास्थळी नागरिक गोळा झाले.

दरम्यान, बँकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार कळवण्यात आला. त्यानुसार 10 लाख 34 हजार 800 रुपयांची रोकड आणि दीड लाखांचे एटीएम मशीन असा एकूण 11 लाख 84 हजारांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पुन्हा एटीएम चोरी…

सांगली जिल्ह्यांत एटीएम चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काही काळापूर्वीच मिरज तालुक्यातील बेडग – आरग रस्त्यावरील खासगी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने उखडून पळवून नेले होते. मशीनमध्ये सुमारे 27 लाख रुपयांची रोकड होती. बुधगाव (ता. मिरज) येथे गॅस कटरने एटीएम फोडून सुमारे 17 लाख 40 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. तर डफळापूर (ता. जत) येथे मोटारीला दोरी बांधून एटीएम मशीन ओढण्याचा प्रयत्न झाला होता. आता सांगलीवाडीत मशीनच पळवल्याने खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर