ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

भिगवण प्रकरणाला नवा कलाटणी:फरार माजी सरपंच अझर शेख गजाआड; वादात मोठी उलथापालथ, तरुणीची भूमिकाही बदलली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अनेक वर्षे फरार असलेल्या अझर शेख याला अखेर अटक केली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा तो माजी सरपंच असून दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवैध वाळू उपसा प्रकरणात स्वामी चिंचोली गावच्या महसूल विभागातील तलाठ्यावर मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो चुलता असल्याची माहिती समोर आली आहे. दौंडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांचा तो निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याचा आरोप भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता. त्यानंतर हिंदू समाजातील काही घटकांकडून त्याच्या अटकेची जोरदार मागणी होत होती. अझर शेख याच्यासह युवराज मेंगावडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिगवणमधील कथित अपहरण प्रकरण चर्चेत आल्यानंतर अझर शेखचे नाव अधिक ठळकपणे समोर आले. संबंधित तरुण आणि तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होण्याच्या काही तास आधी त्याने समाजमाध्यमावर सदैव एकनिष्ठ, असा संदेश प्रसिद्ध केला होता. या संदेशामुळे तरुण-तरुणीला पळवून नेण्यात त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दौंड परिसरातील विविध गुन्ह्यांमुळे त्याची आधीपासूनच चर्चा होती. स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या सर्व प्रकरणांची चौकशी वेगाने सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एकवीस वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. संबंधित तरुणी आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना, तिच्या आई व भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात हजर झालेल्या तरुणीने मात्र आपण संबंधित तरुणावर प्रेम करत असून स्वेच्छेने त्याच्यासोबत गेल्याचे स्पष्ट केले होते. आई आणि भावाने दिलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत तिने प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. त्या वेळी तिची भूमिका ठाम होती. नंतर सुरक्षेच्या कारणास्तव तरुणीची रवानगी महिला पुनर्वसन केंद्रात करण्यात आली. पाच दिवस ती तेथे राहिली. यापूर्वी वीस फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयात तिने जहीर शेखसोबतच जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मुस्लिम समाजातील तरुणासोबत निघून गेल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर वीस फेब्रुवारीला ती त्या तरुणासह बारामती पोलिस ठाण्यात हजर झाली होती. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गाजले. भूमिका बदलत आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी झाली. न्यायालयाने तरुणीला काही प्रश्न विचारले असता तिने आपली भूमिका बदलत आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी आईसोबत जाण्यास नकार देणारी हीच तरुणी आता आईकडे परतण्यास तयार झाल्याने प्रकरणात मोठी कलाटणी आली आहे. न्यायालयाने तिची इच्छा नोंदवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. संपूर्ण प्रकरण नव्या वळणावर भिगवण प्रकरणातील या बदलत्या घडामोडींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका बाजूला अझर शेखची अटक, तर दुसऱ्या बाजूला तरुणीचा बदललेला जबाब यामुळे संपूर्ण प्रकरण नव्या वळणावर आले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून संबंधित सर्वांच्या भूमिकांची चौकशी केली जात आहे. दौंड, भिगवण आणि बारामती परिसरात या घटनांमुळे मोठी चर्चा रंगली आहे. पुढील काही दिवसांत न्यायालयीन प्रक्रियेतून या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर