ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

माणिकराव कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?:कायद्याचा गाढा अभ्यास असणारे नार्वेकर कोकाटेंची आमदारकी का रद्द करत नाहीत?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी 2 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 2 वर्षे किंवा त्याहून अधिकच्या शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींच्या पदावर गदा येते. त्यामुळे आता कोकाटेंचे मंत्रिपदही जाण्याची शक्यता वाढली आहे. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा मुख्यमंत्र्यांनी याविषयी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा, असे त्यांनी म्हटले आहे. कोकाटेंची तत्काळ हकालपट्टी करा – दमानिया दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. माणिकराव कोकाटे हे आमदारकीतून आणि मंत्रीपदावरून तत्काळ बाहेर. सेक्शन 8 (4) हा कायदा ज्यामुळे अपील मध्ये गेल्यावर दिलासा मिळायचा हा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द (Ultra Vires) घोषित केला आहे. त्यामुळे ते अपील जरूर करू शकतात, पण त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी संपली, असे त्यांनी म्हटले आहे. कोकाटेंच्या अटकेसाठी कोर्टात अर्ज माणिकराव कोकाटे यांच्या नावाने अटक वॉरंट काढण्यासाठी प्रथ वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला आहे. कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केला आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे. कोर्टाने अटक वॉरंट काढण्याची मुभा दिली, तर कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वाढली आहे. कोकाटे या प्रकरणी हायकोर्टात दाद मागणार असल्याचीही माहिती आहे. अजित पवारांची फडणवीसांकडे धावाधाव दुसरीकडे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता वाढल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी कोकाटेंना अटक झाल्याच्या स्थितीत काय करायचे? यावर चर्चा केली आहे. त्यात फडणवीसांनी कोकाटेंवर कारवाई झाली तर पुढे काय करायचे याचा निर्णय अजित पवारांवरच सोपवल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोकाटेंच्या राजीनाम्याच्या बाजूने नाही, पण अटक वॉरंट होण्यास पक्षाची कोंडी होऊ शकते. त्यामुळे अजित पवार याविषयी काय निर्णय घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर