ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’चे ठरले:भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढणार, काँग्रेसच्या स्थापना दिनी युतीची अधिकृत घोषणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना काँग्रेस आणि वंचित हे ‘नैसर्गिक मित्र’ असल्याचे नमूद केले. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. याआधी नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढलो, त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. आज तीच भूमिका पुढे नेण्यासाठी आम्ही ‘समविचारी’ म्हणून अधिकृतपणे एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे, आज काँग्रेसच्या स्थापना दिनीच हा ऐतिहासिक युतीचा योग जुळून आल्याने एका नव्या वैचारिक अध्यायाला सुरुवात झाली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत सांगितले. भाजपला रोखणे युतीचा मुख्य केंद्रबिंदू हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भारिप सोबत आमची आघाडी होती. 1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. 25 वर्षानंतर आघाडीच्या घोषणेचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे, असे म्हणत त्यांनी मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. आमची आघाडी विचाराची आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ नाही तर विचारांचा मेळ आहे. आमची आघाडी विचारांची आहे, सत्तेसाठी नाही. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार, असे देखील ते म्हणाले. वंचित मुंबईत 62 जागा लढणार, काँग्रेसचे काय? वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ऑनलाइन बैठकीत युतीला मान्यता दिली आहे. 227 पैकी 62 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, काँग्रेस किती जागा लढवणार हे अद्याप सांगण्यात आले नाही, कारण काँग्रेसची शरद पवार गटासोबत जागावाटपाबबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी दाखवल्याची माहिती समोर येत आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटासमोर आव्हान या युतीमुळे मुंबईत आता महायुती, महाविकास आघाडी आणि आता ही तिसरी मोठी ताकद म्हणून समोर आलेली काँग्रेस-वंचित आघाडी यांच्यात चौरंगी संघर्ष पाहायला मिळणार आहे. आगामी काळात ही नवी आघाडी जागावाटपाचे कोणते सूत्र राबवते आणि भाजपसमोर कोणते आव्हान उभे करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर