ब्रेकिंग न्यूज
Antarwali Sarati News | अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी आंदोलक ताब्यात! काय घडलं? Sreesanth Sanju Samson Controversy : हँडशेक सोडा, एकमेकांकडं बघितलंही नाही! संजू सॅमसन अन् श्रीसंत यांच्यात… पंढरपूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! गावात बांधला ‘सोन्या’चा बंगला, Video पाहाल तर कौतुकच कराल! Sambhajinagar: लग्नानंतर पतीची भयंकर डिमांड, निकितानं आईला फोन केला अन्… छ. संभाजीनगरात स्मशानभूमीच राडा Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi
SP News Maregaon

24 तासांत अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खूनप्रकरणाचा छडा; तिघांना अटक

20 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खूनप्रकरणाचा छडा लावत तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलाच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 5 जून रोजी दांडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरातील जंगलात गौतम ठमके यांच्या शेतालगतच्या खड्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने आणि मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने मारेगाव पोलिसांनी मर्ग दाखल करून सखोल तपास सुरू केला.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने पुरावे संकलित करण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

तपासादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी गावात चौकशी करण्यात आली. तेथे काही नागरिकांनी मृत व्यक्तीची ओळख विनोद प्रल्हादराव सहारे (वय 35, रा. मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) अशी पटवून दिली. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनीही फोटो व वापरातील वस्तूंवरून ओळख निश्चित केली.

दरम्यान, समांतर तपास करणाऱ्या पथकाला या प्रकरणातील संशयित व्यक्तींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. तपासात समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे प्रविण अशोक वरधने (रा. आपटी), राजू नथ्थुजी ढेंगळे (रा. दांडगाव) आणि शंतनू झाडे (रा. नागरी, ता. वरोरा) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी क्रमांक 1 याच्या बहिणीस मृत व्यक्तीकडून वारंवार त्रास होत असल्याच्या रागातून संबंधित व्यक्तीला वरोरा येथून मोटारसायकलवर घेऊन मार्डा धरण परिसरात आणण्यात आले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह जंगलातील खड्यात फेकून दिल्याचा संशय तपासात पुढे आला आहे.

याप्रकरणी सहाय्यक फौजदार दिगंबर किनाके यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संयुक्त पथकाची उल्लेखनीय या

कारवाईत पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, पोलीस शिपाई सागर दीपेवार, राजन इसंकर तसेच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनावर, पोलीस हवालदार इकबाल शेख आणि अजय वाभिटकर यांनी संयुक्तरित्या सहभाग घेतला.अनोळखी मृतदेहापासून आरोपींपर्यंत पोहोचत अवघ्या 24 तासांत प्रकरणाचा उलगडा केल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर