ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Nana Patekar Passes Away Last 45 Minutes of Life : आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं आज वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरूवारी सकाळी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी येताच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. गोव्यातील त्यांच्या घरी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना दोनापावला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 5:20 वाजता त्यांचे निधन झालं.
हृदयविकाराचा तीव्र झटका अन्…
गोव्यातील नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना 45 मिनिटं वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांना 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला, परंतु त्या संपूर्ण काळात त्यांच्या हृदयाची हालचाल पुनरुज्जीवित होऊ शकली नाही अन् 5:20 वाजता त्यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांचं पोस्ट मॉर्टम केलं जाणार आहे.
निवासस्थानी वैद्यकीय पथक पाठवलं
मृत्यूचं कारण वैद्यकीयदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या निश्चित करण्यासाठी पोस्टमॉर्टेम आवश्यक ठरू शकते असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एक वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते. घटनास्थळीच ‘कार्डियाक मसाज’ देण्यात आला आणि त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे.

Nana Patekar Passes Away : पहाटे 5:20 मिनिटांनी नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास, गोव्यात निधन; डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण
सिंहगड पायथ्याजवळ डोणजे गावात अंत्यसंस्कार 
नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावात त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार होणार आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आलीये. गोव्याहून पार्थिव एअरलिफ्ट करून पुण्यात आणलं जाणार आहे.
नाना पाटेकरांचं मोठं योगदान
नाना पाटेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून 2015 मध्ये ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. नाम फाउंडेशन ही संस्था दुष्काळग्रस्त भाग, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्राच्या अनेक भागात पाण्यासाठी नाना पाटेकरांचं मोठं योगदान होतं.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर