ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जिल्ह्याला 2राज्यस्तरीय कृषी पुरस्कार; वंदना धोत्रे, राजेंद्र तालेंच्या कामाची दखल:मुंबईत 1 जुलै रोजी मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाकडून २०२४ वर्षासाठीचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात जिल्ह्याने दुहेरी बहुमान पटकावला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतकरी वंदना देविदास धोत्रे यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ तर दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांना सेंद्रिय शेतीसाठीचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार विजेत्या वंदना धोत्रे यांनी दोन एकरात १००% सेंद्रिय शेती फुलवली आहे. वंदना धोत्रे यांना सेंद्रिय शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जिजामाता कृषिभूषण’ पुरस्कार जाहीर झाला. दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या १ जुलै रोजी मुंबईत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडणार आहे. वंदना धोत्रे यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यापैकी दोन एकरावर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने विविध भाजीपाल्यांचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. शेतातील झाडपाला, कंपोस्ट खत, गोमूत्र आणि घरीच तयार केलेले ‘जीवामृत’ वापरुन नैसर्गिक शेती फुलवली आहे. त्यांच्या या प्रयोगाची कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून दखल घेतली होती. यापूर्वी विदर्भातील उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेनेही त्यांचा सन्मान केला आहे. राजेंद्र ताले यांना सेंद्रिय शेतीतील उत्कृष्ट योगदानासाठी ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वतःच्या कष्टावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा हा आदर्श पॅटर्न उभा केला आहे. ताले हे १९९९ पासून म्हणजेच गत २५ वर्षांपासून १०० टक्के सेंद्रिय शेती करत आहेत. पिकांच्या वाढीसाठी व कीड नियंत्रणासाठी ते लसूण, मिरची, तंबाखू, गूळ, अंडी, ताक आणि मोड आलेल्या धान्यांचा वापर करून स्वतःच सेंद्रिय कीटकनाशके व जीवामृत तयार करतात. त्यांच्या साडेसहा एकर शेतीत ते दरवर्षी केळी, पपई, कापूस, हळद यांसह ३० ते ३५ प्रकारची पिके घेतात. त्यांनी स्वतः केळी व पपईची नवी जात विकसित केली आहे. एका एकरात साडेआठ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर