ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune Court Firing Case: ज्या कारणाने ‘गेम’चा प्लॅन झाला, त्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणात मंदारची काय भूमिका… ✦ ⚡ ब्रेकिंग अपडेट : जळका अपघातातील गंभीर जखमी पतीचाही मृत्यू; पती-पत्नी दोघांचाही दुर्दैवी अंत! ✦ ⚡ Pune Court Murder Case: कात्रजमध्ये २० एप्रिल २०२५ रोजी काय घडलं होतं? त्याचा बदला घेण्यासाठी दीड वर्ष वाट… ✦ ⚡ जळका बसस्टॉपवर कार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी! ✦ ⚡ Special Report | Indrayani Rice|इंद्रायणी तांदूळ महागणार! किलोमागे ३० रुपयांची दरवाढ होण्याचा अंदाज ✦ ⚡ MPSC Recruitment: सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका! 16717 पदांसाठी मेगा भरती, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सं… ✦ ⚡ MPSC Recruitment: सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका! 16717 पदांसाठी मेगा भरती, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सं… ✦ ⚡ चोपण गावात काकड आरतीचा भक्तिमय जागर! ✦ ⚡ ‘तो’ भेटायला बोलवायचा अन् सारखं ठिकाण बदलायचा, ‘इन्स्टा’चा मेसेज पाहून ती गेली, पण भावांनी…, छ. संभाजीनगर… ✦ ⚡ Solapur: लग्न करतो म्हणाला, अल्पवयीन मुलीला घरातून पळवलं अन् नको तेच केलं, आरोपीला मोठी शिक्षा
SP News Maregaon

Pune Court Murder Case: कात्रजमध्ये २० एप्रिल २०२५ रोजी काय घडलं होतं? त्याचा बदला घेण्यासाठी दीड वर्ष वाट…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसराबाहेर दिवसाढवळ्या गोळीबार आणि कोयत्याने वार करून मंदार मारुती किवळे (वय ३६) याची निर्घृण हत्या करण्यात आली. तब्बल वर्षभरापासून सूडाच्या आगीत धगधगणाऱ्या हल्लेखोरांनी अखेर संधी साधत कोर्टाबाहेरच मंदारचा काटा काढल्याची माहिती समोर आली आहे. दीड वर्षभरापूर्वी, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रजमध्ये घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात मंदार किवळे आरोपी होता आणि नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता.
वादाचं नेमकं कारण काय होतं?
समोर आलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील संतोषनगर परिसरात राहणारा मयत शुभम सुभाष चव्हाण याच्या घराशेजारील जमिनीवरून शुभम चव्हाण आणि मुख्य आरोपी अमर दिलीप साकोरे (वय ४०) यांच्यात वाद सुरू होता. याच जमिनीच्या वादातून २० एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शुभम संतोषनगर भागातून निघाला असताना अमर साकोरे आणि मंदार किवळेसह त्यांच्या साथीदारांनी शुभमला अडवून शिवीगाळ व मारहाण सुरू केली.
बांबू, स्टंपने बेदम मारहाण अन् डोक्यात घातला होता दगड
आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम तेथून जीवाच्या आकांताने पळाला. मात्र, चौघा हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले. लाकडी बांबू आणि स्टंपने शुभमला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते.
पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या
या खुनानंतर आंबेगाव पोलिसांनी अमर दिलीप साकोरे, मंदार मारुती किवळे, गिरीश सुभाष बाबरे (वय २५) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय ३५) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कामठी बु. येथे छापा टाकत पसार झालेल्या या चौघांना बेड्या ठोकल्या होत्या.
जामिनावर सुटताच कोर्टाबाहेर संपवलं
या प्रकरणात मंदार किवळे याला चारच दिवसापूर्वी जामीन मिळाला होता. आज खटल्याशी संबंधित प्रक्रियेसाठी मंदार शिवाजीनगर कोर्टात येत होता. मात्र, त्याच पाच ते सात जणांनी लावलेल्या सापळ्यात मंदार अडकला. मंदारवर गोळीबार करण्यात आला. मात्र, त्यात तो जखमी झाला. त्याला संपवण्यासाठी त्याच्यावर थेट कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचे हात छाटले गेले.रक्तबंबाळ झालेल्या मंदार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शुभमचा भाऊ निघाला मास्टरमाईंड…
आज शिवाजीनगर कोर्टात झालेल्या हल्ला प्रकरणात अक्षय चव्हाण हा प्रमुख आरोपी आहे.आपला भाऊ शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच मंदारची आज हत्या करण्यात आली. अक्षय चव्हाण याने १२ ते १५ जणांना सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोन आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर