ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा: अंगात भूत असल्याचं सांगून ते काढण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबानं 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटेनेनं सातारा हादरलं. आता फलटणमध्ये घडलेल्या या प्रकरणात धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पीडित कुटुंबाला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावण्यात येत असून एक चिठ्ठी आणि लिंबू घराबाहेर टाकण्यात आलंय. त्यामुळे कुटुंबात भीतीचं वातावरण आहे.

पीडितेच्या कुटुंबानं भोंदूबाबाच्या विरोधात फलटण शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर कुटुंबीयांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. भोंदू गुरू आणि चेल्याकडून एक धमकीवजा चिठ्ठी दारात टाकण्यात आली आहे. यामध्ये ‘अमावस्येपर्यंत तक्रार मागे न घेतल्यास सगळं घरदार संपवू”, अशी धमकी देण्यात आली आहे. तसेच या चिठ्ठीजवल लिंबू, हळद-कुंकू आणि टाचण्याही ठेवण्यात आल्या असून कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.

अवघ्या 14 वर्षांची मुलगी, शाळेत सोडायला म्हणून नेलं अन्… भोंदूबाबाचं भयंकर कांड, सातारा हादरलं!

नेमकी घटना काय?

नववीत शिकणाऱ्या मुलीला भूतबाधा झाल्याचं सांगत एका भोंदूबाबानं कुटुंबाला विश्वासात घेतलं. त्यानंतर जादूटोणा करत तिच्या अंगातील भूत काढल्याचा बनाव केला. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट 2024 मध्ये संशयित सौरभ मदने हा मुलीला शाळेत सोडायला म्हणून घेऊन जायचा. तसेच एका जुन्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.

पीडितेने हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिच्या आईवडिलांना ठार करण्याची धमकी मदने देत होता. भीतीने पीडितेने घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. बदनामी आणि संशयाच्या भीतीने पीडित मुलगी घाबरली होती. शेवटी ती वाईला निघून गेली. तेव्हा तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणात फलटण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आंधळा विश्वास नको

अशोक खरात प्रकरणाने सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. अंधश्रद्धा आणि त्यातून होणाऱ्या शोषणावर चर्चा झाली. मात्र, असे प्रकार अजूनही घडत आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलींच्या बाबतीत पालकांनी कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. त्यासाठी डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ किंवा संबंधित शासकीय यंत्रणांची मदत घेणे गरजेचे असल्याचे पोलीस सांगत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर