ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या:वारी धरण शेजारी असूनही अकोट तहानलेले‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १, ३, ९ आणि १७ मधील पाणीपुरवठ्याबाबत मागील पाच वर्षांपासून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर गुरुवारी अजीम इनामदार, नगरसेवक डॉ. युसूफ खान हादीक खान व संतप्त नागरिकांनी मजीप्रा कार्यालयाबाहेर ४५ अंश तापमानात भर उन्हात ठिय्या आंदोलन केले. यापूर्वी २०२४ आणि मार्च २०२६ मध्ये सुद्धा प्रशासनाने नियमित पाणीपुरवठा करू, असे लेखी आश्वासन देऊन आंदोलनकर्त्यांची बोळवण केली होती. मात्र, महिना उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी या आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे केली. घागर मोर्चा काढणार ^प्रशासकीय अधिकारी फोन उचलत नाहीत आणि कंत्राटी कर्मचारी “आमच्या अधिकार क्षेत्रात नाही’ अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. जर संपूर्ण अकोट शहराला समसमान आणि नियमित पाणी मिळाले नाही, तर महिलांना सोबत घेऊन थेट तीव्र घागर मोर्चा व आमरण उपोषण छेडले जाईल. – रेश्मा परवीन मोहम्मद अजीम इनामदार, नगरसेविका.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर