ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

Kolhapur: पती-पत्नीत भांडण, आजीसासू भाकरी करत होती, नातजावयाचं भयंकर कृत्य, कोल्हापुरात खळबळ

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: पती-पत्नीतील वादाला कारणीभूत असल्याचा राग मनात धरून नातजावयानं भयंकर पाऊल उचललं. चुलीसमोर भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल टाकलं. त्यामुळे चुलीतील आगीचा भडका उडाला आणि त्या 45 टक्के भाजून जखमी झाल्या. सुलोचना पुंडलिक कदम (वय 65) असे जखमी महिलेचे नाव आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हसूरसासगिरी येथील घटनेनं खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी नातजावई गुरुनाथ शशिकांत शिंदे (वय 31, रा. चिंचेवाडी, ता. गडहिंग्लज) याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गडहिंग्लज पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Kolhapur: आधी स्वत:च्या बापाला संपवलं, जामिनावर बाहेर आला अन् भरदिवसा…, कोल्हापूर हादरलं

पोलिसांनी सांगितले की, गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी येथे गुरुनाथ पत्नी प्रीती आणि एक वर्षाच्या अपत्यासोबत राहात होता. त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणे होत होती. प्रीती गेल्या 15 दिवसांपासून सुलोचना कदम यांच्याकडे राहण्यास गेली होती. तिला परत पाठवण्यासाठी गुरुनाथ हा वारंवार फोन करत होता.

प्रीतीला परत पाठवून देत नसल्याने गुरुनाथ हा थेट हसूरसासगिरीला गेला. भांडणाला सुलोचनाच कारणीभूत असल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यामुळे जातानाच तो बाटलीत पेट्रोल घेऊन गेला होता. सकाळी दहाच्या सुमारास हसूरसासगिरी येथील घरात गेल्यानंतर गुरुनाथ याने आजीसासू सुलोचना यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली.

आजीसासू असणाऱ्या सुलोचना या चुलीसमोर भाकरी करत होत्या. वाद वाढत गेल्यावर रागाच्या भरात गुरुनाथ याने लांबूनच पेट्रोल त्यांच्या दिशेने भिरकावले. त्यामुळे चुलीतील आगीचा भडका उडाला आणि आगीने सुलोचना यांना कवेत घेतलं. त्यात त्यांचा चेहरा, मान आणि शरीराचे इतर भाग भाजले होते. त्यात गंभीर जखमा झाल्या होत्या.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश मोरे करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर