ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मांगली रेल्वेगेट वरील गेटमॅनला मारहाण करून पसार झालेला संशयित आरोपीला अदीलाबाद वरून अटक

65 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

२१ दिवसानंतर मुकूटबन पोलिसांच्या ताब्यात

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी:- मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील रेल्वेगेट वरील कर्मचाऱ्याला मारहाण करून पसार झालेल्या संशयीत आरोपीस अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
१४ एप्रिलच्या रात्री ८.४५ वाजता दरम्यान  रेल्वे येत असल्यामुळे रेल्वेगेट बंद केले. तेवढ्यात मुकुटबन येथील तरुण राहुल दुर्गे हा दुचाकीने आला व गेट उघड असे म्हणाला. गेटमॅन ने  रेल्वे गेल्यावर गेट उघडतो थोडं थांब असे म्हणताच मद्यधुंद अवस्थेत असलेला राहुल दुर्गे याने गेटमॅन धर्मेंद्रकुमार मीना याला लाथाबुक्यांनी मारहाण केली व नाकावर मारून रक्तबंबाळ केले त्यात नाकावरील हाड मोडले. जखमी धर्मेंद्रकुमार याने मुकूटबन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी कलम ३५३, ३३२,३२४ व इतर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्याची महिती मिळताच संशयित आरोपी राहुल दुर्गे फरार झाला. पोलिसांकडून शोधाशोध करून अखेर ४ एप्रिलच्या रात्री संशयित आरोपी आदीलाबाद येथे असल्याची माहिती मिळताच जमादार प्रवीण तालकोकुलवार व संजय खांडेकर हे खाजगी वाहनाने जाऊन आरोपीच्या मित्राच्या घरून अटक करून मुकूटबनला आणले. संशयित आरोपी राहुल दुर्गे जवळून दुचाकी  मोपेड क्रमांक एपी ०१, एसी ४५१८ जप्त करण्यात आली असुन संनशिय आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान व संदीप कुमरे करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर