ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

डायल 112 वर खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल; मारेगाव पोलिसांची तात्काळ कारवाई

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : डायल 112 या आपत्कालीन सेवेवर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची दिशाभूल होत असल्याने पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी सकाळी डायल 112 वर खंडणी शेतशिवारात दारू विक्री होत असल्याची माहिती देणारा कॉल प्राप्त झाला. त्यानुसार पोलीस कर्मचारी नरेंद्र प्रभाकर तुमराम, चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल सरोदे व होमगार्ड सोमलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तेथे पोहोचल्यावर कोणतीही दारू विक्री होत नसल्याचे आढळून आले.

दरम्यान, माहिती देणारा कॉलर सुनिल पोतु आत्राम (वय 36, रा. जानकाई पोड, ता. मारेगाव) हा घटनास्थळी दारूच्या नशेत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. संबंधित आरोपीने 11 मार्चच्या रात्रीपासून 12 मार्चच्या पहाटेपर्यंत डायल 112 वर वारंवार खोटे कॉल करून दारू विक्रीची खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांना वारंवार घटनास्थळी जावे लागले आणि प्रशासनाचा वेळ व साधनांचा अपव्यय झाला.


या प्रकारामुळे शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आपत्कालीन सेवेचा गैरवापर झाल्याने मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 217, 221 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तू किनाके करीत आहेत.

मारेगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल 112 ही आपत्कालीन सेवा अत्यंत महत्त्वाची असून तिचा गैरवापर करू नये. खोट्या तक्रारी करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर