ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon


अट्टल चोरट्यास पाचव्यांदा सश्रम कारावासाची शिक्षा.

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

झरी न्यायालयाचा निकाल.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जमणी:जबरी चोरी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झरी बी.एस.वाढई यांनी आरोपी नामे दत्ता सुरेश लिंगरवार वय ३५ वर्षे रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास एक वर्षे १०००/- रुपये दंडाची सश्रम कारावासाची शिक्षा दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सुनावली आहे.तसेच यापुर्वी सुद्धा झरी न्यायालयाने सदर आरोपीला तीन गुन्ह्यात व मारेगाव न्यायालयाने एका गुन्ह्यात वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
झरी जामनी तालुक्यातील पोलीस स्टेशन पाटण अंतर्गत फिर्यादि ही राहते.दिनांक ०४.१२.२०१९ रोजी फिर्यादी ही तीचे शेतात एकटी कापुस वेचायला गेली होती सायंकाळी चार ते पाच वाजताचे दरम्यान कापुस वेचत असताना कचरा वाजल्याचा आवाज आल्याने पाठीमागे वळुन पाहिले असता थोड्या अंतरावर एक माणुस दिसला फिर्यादी घाबरून कापसाचा ओटा काढुन ओरडत पळु लागली परंतु प-हाटीला अडकुन खाली पडली असता आरोपीने फिर्यादीचे तोंडात कापुस कोंबुन तीचे गळ्यातील सोन्याचे डोरले व नगदी ४००/- रु. घेवुन पळुन गेला वरुन फीर्यादी पतीसह पोलीस स्टेशनला जावुन घटनेची तक्रार दिली.

वरुण पोलीसांनी आरोपी विरूद्ध भादवीचे कलम ३९२ अंतर्गत गुन्हा नोंद केला व सदर गुन्हाचा तपास जमादार रमेश पिदूरकर ब.न.८०९ यांनी करून प्रकरणात आरोपीस अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी,तपास अधिकारी यांचे सह सात साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी.डी.कपुर व ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी जमादार मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहीले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर