ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर कारवाई

1.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कोसारा शिवारात महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातून रेतीची अवैध उत्खनन करून तालुक्यातील कोसारा येथील रोडवरुन वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर मारेगाव महसूल विभागाने धडक कारवाई केली.ही कारवाई आज दि.20 जुलै 2025 रोज रविवारला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून ट्रॅक द्वारे मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील रोडवरुन अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मारेगाव तहसीलदार यांना मिळाली.त्यांनी सापळा रचित कोसारा शिवारातील रस्त्यावर रेतीने भरलेल्या दोन ट्रक अवैध वाहतूक करीत असताना पकडले ही कारवाई उपविभागीय अधिकारी वणी नितीनकुमार हिंगोले यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केली.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी प्रविण उपाध्याय, बी एन धोटे, महसूल महसूल सहाय्यक प्रशांत ढंगारे,सेवक दिलीप पचारे,अमित येवले यांनी मोठ्या शिताफीने रेतीची अवैध वाहतूक करीत असलेले दोन ट्रक संयुक्तपणे पकडून तहसील कार्यालय मारेगांव चे परिसरात लावण्यात आलेला आहे. ह्या कारवाईमुळे अवैध रेती व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर