ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अरे बापरे.. बुरांडा (ख)शेतशिवारात आढळली वाघाची गुफा.

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

काही शेतकऱ्याला प्रत्यक्ष पने वाघाचे दर्शन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]


मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख)येथील शेतशिवारात आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोज शुक्रवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास अरुण ढेंगळे या शेतकऱ्याच्या शेतातीली व बाजुच्या शेतातील कापुस वेचणीचे काम सुरू असताना काही शेतकऱ्या सह महिलांना प्रत्यक्ष पने वाघाचे दर्शन घडले आहे.

परीसरात शेतातील कामाची जोमाने लगबग सुरू झाली असुन परिसरात वाघाचे आगमन झाल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या बुरांडा (ख)परिसरातील शेतशिवारात कापुस वेचणी व तुरीवर फवारनी सह शेतकऱ्याचे चना,गहु याला पाणी देण्याचे कामे जोमाने सुरू आहे.

त्यातच बुरांडा (ख)येथील शेतकरी अरुण राजेश्वर ढेंगळे रा.बुरांडा (ख) यांचे शेत गट क्रमांक 141 मधील त्यांचे शेतातील बिहाळ्याच्या झाळाच्या बाजुला वाघाची गुफा आढळून आली आहे.

त्या गुफे मध्ये वाघाचे ठसे पष्ट पने दिसत आहे.एका शेतकऱ्याने त्वरीत वन विभागाला या संदर्भात माहिती दिली असुन परिसरात शेतीचे काम जोमाने सुरू आहे.त्या मुळे वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे परिसरातील नागरिकांकडून आव्हान केल्या जात आहे.

प्रतिक्रिया..
बुरांडा (ख) व खेकडवाई शेत शिवारात वाघ आहे. “जनजागृती” सर्व शेतकऱ्यांनी शेतातली कामे करतांना किंवा कापुस वेचणी करत असताना सावधगिरी बाळगावी शेतात सकाळी लवकर एकट्यानी जाण्याचे टाळावे शेतात जातांना बोलत किंवा आवाज करत जावे व सायंकाळी शेतातुन लवकर यावे.असे आवाहन शंकर ग. हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर