ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भैय्याजी कनाके अध्यक्ष तर सुरेश पाचभाई सचिवपदी

204 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पत्रकार संरक्षण समितीची नवी कार्यकारिणी घोषित

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव

मारेगाव तालुका पत्रकार संरक्षण समितीची  नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यात भैयाजी अंबादास कनाके यांची अध्यक्ष म्हणून तर सुरेश निळकंठ पाचभाई यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. ही निवड सर्वानुमते करण्यात आली.

मारेगाव तालुका पत्रकार संरक्षण समितीचे कार्यरत अध्यक्ष यांचा कार्यकाल संपलेला होता.त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडी करीता दि.10 ऑगस्टला  मारेगाव येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये भैय्याजी अंबादास कनाके यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

तर सचिव म्हणून सुरेश निळकंठ पाचभाई यांची निवड करण्यात आली. इतर प्रतिनिधीमध्ये उपाध्यक्ष सुमित गेडाम, सहसचिव शरद खापणे, कोषाध्यक्ष धनराज खंडरे,संघटक गजानन आसूटकर, प्रसिद्धी प्रमुख प्रफुल ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ मोरेश्वर ठाकरे, सुरेश नाखले, सुमित हेपट,भास्कर राऊत उपस्थित होते.

योग्य ध्येयधोरणे राबवून सर्वसामान्य जनतेसाठी लढा देणार –
भैय्याजी कनाके माझी अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली निवड ही मी सार्थ ठरविणार.सर्वसामान्य जनता, शेतमजूर, शेतकरी तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी आणि संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करील असे आश्वासन दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर