ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


– मारेगाव येथील मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव,

जागतिक महिला दिना निमित्त दि.8,9 व 10 मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.व महिलांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांच्या सामजिक उत्थानासाठी सदैव अग्रेसर असलेल्या मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने 8 मार्चला दुपारी 2 वाजता प्रसिद्धीच्या प्रवाहात नसलेल्या परंतु सकारात्मक कार्य करणाऱ्या कर्तुत्वान नोंदणीकृत महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
       
या कार्यक्रमाचे स्थळ शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कुंडकर उपसंपादक लोकमत,प्रमुख पाहुणे गजानन खापने संचालक वसंत जिनिंग मारेगांव,सौ.इंदुताई किन्हेकर माजी नगराध्यक्ष मारेगाव,हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच सन्मान स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा शोभायात्रा 9 मार्चला सायंकाळी 4 वाजता भव्य स्त्री सन्मान शोभायात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून शहरात मार्गक्रमण करीत परत येईल.शोभायात्रेत विविध राज्याचे लोकनृत्य आणि देखावे सादर केले जाईल.

या भव्य महिला सांस्कृतिक रॅली चे उदघाटन सौ.किरणताई देरकर यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. इजहार शेख ,सौ. संध्या पोटे,कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव चे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा हे उपस्थित राहणार आहे.तसेच नृत्यस्पर्धा दिनांक 10 मार्चला सायंकाळी 5 वाजता असुन 30 वर्षा वरील वयोगटाच्या महिला करीता नृत्यस्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

वसंत जिनिंगच्या पटांगणामध्ये होणारी ही नृत्य सपर्धा समूह नृत्य व एकल नृत्य अश्या दोन प्रकारे घेण्यात येणार आहे. या नृत्य स्पर्धा चे उदघाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी पतसंस्था वणी,प्रमुख पाहुणे संजयभाऊ खाडे अध्यक्ष जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को सोसायटी ली.वणी,रविभाऊ धानोरकर संचालक वसंत जीनिंग वणी, श्रीमती शामा दीदी तोटावार वणी, डॉ.मनीष मसकी नगराध्यक्ष मारेगाव,डॉ.विनोद कुमार आदे संपादक वणी न्यूज एक्स्प्रेस वणी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समूह नृत्याला प्रथम 11000 द्वितीय 7000 तृतीय 5000 रोख एकल नृत्याला प्रथम 7000 द्वितीय 5000 तृतिय 3000 रोख आणि चषक देण्यात येणार आहे .प्रवेश फी समूह नृत्यासाठी 500 तर एकल नृत्यासाठी 200रूपये राहील.प्रवेशासाठी सौ.प्रतिभा डाखरे 9922669648, सौ.बीना दुपारे हेपट 9356035463 सौ.मयुरी जैस्वाल 7066006684 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन  मारेगावं मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजक दीपक जूनेजा यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उदयभाऊ रायपुरे, गजानन जैस्वाल,शहाबुद्दीन अजानी, दुष्यंत जैस्वाल आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर