ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका:जस्टिस बदर समितीचा अहवाल ‘अवैज्ञानिक’ असल्याचा केला दावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणावरून महाराष्ट्र सरकार आणि जस्टिस बदर समितीवर निशाणा साधला आहे. या समितीने तज्ज्ञ संस्था किंवा लोकांचा सहभाग न घेता केलेले वर्गीकरण अशास्त्रीय असल्याचे सांगत, हे विभाजन केवळ ‘कास्ट’ पद्धतीने न होता ‘इक्वल डिस्ट्रिब्यूशन’च्या तत्त्वावर व्हायला हवे होते, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. आरक्षणाच्या यादीत बदल करण्याचा अधिकार संसदेचा असताना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरही त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात लागला आहे. त्याला अनुसरून जस्टिस बदर साहेबांची एक समिती स्थापन करण्यात आली. आंध्र प्रदेशच्या जुन्या निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करण्याचा जो अधिकार आहे हा राज्य शासनाचा नाही, तो पार्लियामेंटचा आहे असे त्या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. एससी एसटीची जी यादी आहे, त्या यादीत जो काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार पार्लियामेंटला आहे, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो अधिकार घेतला आणि त्यांनी निर्णय दिला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु, ते वर्गीकरण कसे झाले पाहिजे? कास्ट पद्धतीने झाले पाहिजे. ज्या पद्धतीने जेएनयू सारख्या संस्था आहेत की त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा काही प्रिन्सिपल्स पाळून इक्वल डिस्ट्रिब्यूशनच्या तत्त्वावर ते त्या ठिकाणी राबावतात, अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असे म्हणेल की जस्टिस बदर यांची जी समिती आहे, या समितीने काही एक्स्पर्ट्स, संस्था किंवा लोकांचा सहभाग करून घेतला नाही. त्यांनी सरसकट डिविजन करून मोकळे झाले. हे डिविजन सायंटिफीक आहे की नाही अशी तपासणी करण्यात आलेली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर