ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

संजय राऊतांना युद्धासाठी इराणला पाठवा!:मविआत राज्यसभेवरून मतभेद, प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संजय राऊत यांनी खासदारकी आणि राजकारण सोडले पाहिजे, त्यांनी वेब सिरीज काढण्याचा धंदा सुरू केला पाहिजे. इराण-इस्रायल युद्ध हे एपस्टीन फाइल्सवरील लक्ष विचलीत करण्यासाठी घडवण्यात येत आहे, असा जावई शोध राऊतांनी लावला आहे, कल्पना करताना तरी विचार करा, वेबसिरीजला शोभेल असे तुम्ही लिहतात, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, तुमच्या खासदार निधीतून तुम्ही एकही जनहिताचे काम केलेले नाही.नुसते राज्यसभेची खुर्ची घेतली पण देशासाठी जनतेसाठी काहीच केले नाही. जनसेवा करणे तुमच्या रक्तातच नाही, जनतेची सेवा करणे तुम्हाला जमलेले नाही, तुम्ही खासदारकी सोडत वेबसिरीज काढली पाहिजे, तुम्हाला आंतरराष्ट्रीय मेडल मिळू शकेल. कटकारस्थानांच्या कथा सांगण्यात राऊत पटाईत आहेत. राज्यसभेसाठी मविआत संघर्ष नवनाथ बन म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीवरुन मविआमध्ये संघर्ष बघायला मिळतो आहे. तिन्हीही पक्ष एकमेकांना पाण्यात बघत आहे. सुप्रिया सुळेंनी उद्धव् ठाकरेंची भेट घेतली तरीही आदित्य ठाकरेंकडून आमचा निर्णय झाला नाही असे ट्विट करण्यात येते. याचा अर्थ आदित्य ठाकरेंचा शरद पवारांच्या उमेदवारीला विरोध दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत हे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मविआत बिघाडी दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंना वाटते की प्रियंका चतुर्वेदींना संधी मिळावी, राऊत अन राष्ट्रवादीला वाटते की शरद पवारांना पुन्हा संधी मिळावी. तर काँग्रेस आपलेच घोडे पुढे दामटत आहे. आदित्य ठाकरेंचा राऊतांना विरोध नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये असलेले मतभेद ही राज्यसभा निवडणुकीत सामोरे आले आहेत. शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. ते रुग्णालयातून बाहेर सुद्धा आले आहेत. उद्या शरद पवारांचा अर्ज भरला जाईल. पण त्यापूर्वी आदित्य ठाकरे त्याच्या उमेदवारीला विरोध करत आहे, म्हणजे ते राऊतांना विरोध करत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यसभेचा अधिकार राऊतांकडे नाही नवनाथ बन म्हणाले की, राज्यसभेचा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार संजय राऊत यांच्याकडे नाहीच. कारण शरद पवार यांना खासदारकी मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. आता जर प्रियंका चतुर्वेदींना संधी मिळाली तर तुम्हाला 2 वर्षींनी संधी मिळणार नाही. दोन वर्षांनी आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रियंका चतुर्वेदीचा पत्ता कापण्याचे काम राऊत करत आहे. मविआमध्ये राज्यसभेसाठी एकमत होऊ शकत नाही तर हे लोकं राज्यासाठी काय एकमत करणार असा टोला बन यांनी लगावला आहे. राऊतांना युद्ध करण्यासाठी पाठवावे नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राष्ट्राच्या प्रमुखांनी चर्चा केली. राऊत म्हणतात की इराणशी चर्चा केली नाही कारण तिथे राऊतांना युद्ध करण्यासाठी पाठवावे लागणार आहे. त्यांनी इराणमध्ये जात लढाईत उतरले पाहिजे. इराणमध्ये शिष्टाई करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात यावी. तर मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणाऱ्या राऊतांना फ्रंटवर पाठवण्याची मागणी बन यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार माती खाल्ल्यामुळेच उभाठा गटाचा पराभव झाला असून यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर