ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

लासलगावला 12 वर्षांपासून विनामूल्य योगाचे धडे:‘अंबिका योग कुटीर’तर्फे ऑनलाईन व ऑफलाईन पाच प्रशिक्षकांकडून आरोग्याचा जागर‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी आरोग्य राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा काळात येथे १२ वर्षांपासून ‘आरोग्य यज्ञ’ सुरू आहे. मुंबई-ठाणे येथील ‘अंबिका योग कुटीर’च्या लासलगाव शाखेने ७०० हून अधिक नागरिकांना योगाचे विनामूल्य धडे देऊन त्यांचे जीवन निरोगी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. योगसाधनेचा वर्ग सन २०१४ पासून सुरू झालेल्या या शाखेच्या वतीने आतापर्यंत ३ महिन्यांची जवळपास ५० हून अधिक योग प्रशिक्षण शिबिरे यशस्वीपणे राबवण्यात आली आहेत. लासलगावसह विंचूर, निफाड परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन हे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना व नागरिकांना विनामूल्य मार्गदर्शन करतात. तीन महिन्यांच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये साधकांकडून शास्त्रोक्त पद्धतीने विविध प्रकारची आसने आणि प्राणायाम करून घेतले जातात. यामुळे दिवसभराचा तणाव कमी होऊन प्रकृती सुधारण्यास मोठी मदत झाल्याची पावती अनेक साधकांनी दिली आहे. ^मन व शरीराच्या स्वास्थासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. मात्र, केवळ एक दिवसयोग करून फायदा होणार नाही, तर तो दैनंदिन जीवनाचा भाग बनावा. – जुगलकिशोर चतुर्वेदी, योग प्रशिक्षक किशोर होळकर, जुगलकिशोर चतुर्वेदी, रवींद्र इंगळे, तुषार देवरे आणि अमिता ब्रह्मेचा हे ५ प्रमुख प्रशिक्षक यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. परमपूज्य भगरी बाबा मंदिराच्या आवारात दररोज पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत हे वर्ग चालतात. सध्या दररोज १० ते १५ साधक प्रत्यक्ष (ऑफलाईन), तर १५ ते २० साधक ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या योगाचे धडे घेत आहेत. मुंबई-ठाणे येथील मुख्य केंद्र असलेल्या ‘अंबिका योग कुटीर’च्या संपूर्ण महाराष्ट्रात १०० पेक्षा अधिक शाखा कार्यरत आहेत. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून समाजाला आजारांपासून दूर ठेवणे आणि सुदृढ पिढी निर्माण करणे, हेच या संस्थेचे मुख्य ध्येय असून, लासलगाव शाखेने यात आपले अमूल्य योगदान दिले आहे. भगरी बाबा मंदिर आवारात रोज पहाटे ५.३० ते ६.३० वर्ग योग हा केवळ एका दिवसाचा उत्सव नाही शिबिरात शिकवले जाणारे योगप्रकार आसने / प्राणायाम : कपालभाती, अनुलोम-विलोम, भस्त्रिका, भ्रामरी, अग्निसार उभे राहून करायची आसने : ताडासन, उष्ट्रासन, गरुडासन, उत्कटासन, वृक्षासन, जानुशिरासन, अर्धचक्रासन बसून करायची आसने : आकर्णधनुरासन, मत्स्यासन, अर्धमत्स्येंद्रासन, शशांकासन

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर