ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची सजावट:शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेक सेवा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाच्या आकर्षक पुष्पप्रतिकृतींनी सजावट करण्यात आली होती. गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या विशेष प्रसंगी विदुषी शैला दातार यांच्या स्वराभिषेकाचेही आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ही विशेष सजावट करण्यात आली होती. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता विदुषी शैला दातार यांनी स्वराभिषेकातून गणरायाच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली. दिवसभरात मंदिरात विविध अभिषेक आणि गणेश याग देखील संपन्न झाले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी या प्रसंगी माहिती दिली की, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले, ज्याला त्यांनी ‘मायाकर’ असे नाव दिले. मायाकराला अनेक वरदान मिळाल्यानंतर त्याने विप्रचित्ती नामक राक्षसाच्या मदतीने पृथ्वी, स्वर्गलोक जिंकले आणि नंतर पाताळावरही आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी अखेरीस भगवान गणेशांचे स्मरण केले. श्रीशेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले. याच अवतारात भगवान श्री गणेशांनी गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी आणि सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तीने युक्त असलेले मूषक हे वाहन म्हणून स्वीकारले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुराचा वध केल्यामुळे या श्रीशेषात्मज अवताराला ‘श्रीमूषकग’ असेही नाव प्राप्त झाले, असे रासने यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर