ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, महापौरांकडून बदली?:मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांवरून संभ्रम; रितू तावडेंकडून स्पष्टीकरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा ‘स्टे’ कायम असतानाच महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला या बदल्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत पत्र लिहिल्याने पालिका वर्तुळात मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून या बदल्या कशा केल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होताच महापौर तावडे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली असून, या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांच्या प्रक्रियेला स्थगिती दिली असतानाच, महापौर रितू तावडे यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला पत्र पाठवल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र रितू तावडे यांनी यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई महापालिकेतील अभियंता बदल्यांवरील स्थगिती उठवण्याची महापौरांनी कोणतीही सूचना केलेली नाही. दी म्युनिसिपल युनियन यांनी पाठवलेले पत्र प्रशासनाकडे नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासाठी फक्त अग्रेषित केले होते. प्रशासनाने स्थगिती विषयक माहिती देणारे अभिप्राय सादर केल्यानंतर ते पत्र दहा दिवसापूर्वीच दप्तरी दाखल केले. त्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता पदावरील अभियंत्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवण्याची कोणतीही सूचना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलेली नाही, असे स्पष्टीकरण तावडे यांच्याकडून देण्यात आले आहे. दि म्युनिसिपल युनियनने अभियंत्यांच्या बदल्यांसंदर्भात महापौरांना दिलेले पत्र केवळ प्रशासकीय अभिप्रायासाठी पुढे पाठवण्यात आले होते, असे स्पष्टीकरण महापौर कार्यालयाकडून देण्यात आले आहे. प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापौरांनी स्वतः दहा दिवसांपूर्वीच ते पत्र दप्तरी दाखल करण्याचे आदेश दिले होते, ज्याचा अर्थ त्यावर कोणतीही पुढील कार्यवाही केली जाऊ नये असा होतो. या स्पष्टीकरणामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशानंतरही महापौरांनी कारवाईचे पत्र लिहिल्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर