ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

100 युनिट वीज वापरणाऱ्यांना ‘स्मार्ट’ सोलार:लाभार्थींना फक्त 2,500 भरावे लागणार! अल्प उत्पन्न व बीपीएल कुटुंबांसाठी मोठी संधी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शासनाने तीन महिन्यांपूर्वी स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप (स्मार्ट) सोलार योजना सुरू केली. यातून दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या अल्प उत्पन्न व बीपीएल कुटुंबांना ९०% ते ९५% अनुदानासह छतावरील सौरऊर्जा संच बसवला जाईल. त्यामुळे २५ वर्षे मोफत किंवा शून्य वीज बिलाचा लाभ मिळेल. स्मार्ट योजनेतून ९० टक्क्यांपर्यंत अनुदान : राज्य शासनाने ऑक्टोबर २०२५ पासून ही योजना अमलात आणली आहे. दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील तसेच बीपीएल कुटुंबांना या योजनेचा प्राधान्याने लाभ दिला जात आहे. १ किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी सुमारे ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधून केंद्र व राज्य शासनाकडून ४७ हजार ५०० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थींना केवळ २ हजार ५०० ते १० हजार रुपये इतकाच स्वहिस्सा भरावा लागणार आहे. २५ वर्षांपर्यंत बचत सौर प्रकल्पाचे आयुष्य लक्षात घेता लाभार्थींना पुढील २५ वर्षांपर्यंत वीज बिलाचा खर्च टळणार. घरगुती पातळीवर सौरऊर्जा निर्मिती वाढल्यास महावितरणवरील भारही कमी होण्यास मदत होईल. राज्यभरात ५ लाख वीज ग्राहकांना सोलार बसवण्याचे उद्दिष्ट आहे. छतावरून वीजनिर्मिती महागाईच्या काळात वाढत्या वीजदरांचा फटका सामान्य नागरिकांना बसत असताना, स्मार्ट सोलार योजना घरगुती अर्थसंकल्पाला मोठा दिलासा देणारी ठरणार. सामान्यांच्या छतावरून वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असलेली ही योजना सौरऊर्जा धोरणात महत्त्वाचा टप्पा आहे. महावितरणची बचत महावितरणला ८ रुपये युनिट एवढा खर्च येतो. सुमारे ६० ते ६५ टक्के १०० युनिट खालील वीज ग्राहक आहेत. त्यांनी सोलार बसवल्यास महावितरणची बचत होईल. महावितरणने टेंडर काढून व्हेंडरची निवड केली जाईल. ग्राहकांना केवळ अर्ज करायचा आहे. लाभार्थींनी अर्ज करावा: दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन ‘स्मार्ट’ सोलार योजना राबवली जाते. लाभार्थींना अर्ज करावा लागेल. टेंडर प्रक्रियेनंतर निवडलेल्या व्हेंडरमार्फत सोलार संच बसवण्यात येतील. -पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर